Tuesday, April 8, 2025
Home साऊथ सिनेमा दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने मला…’

दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने मला…’

दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तुर ही तिच्या ग्लॅमरस अंदाजाने नेहमीच सगळ्यांच्या मनावर राज्य करत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी ही अभिनेत्री अनेकवेळा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते. अशातच तिने तिचे मालदीवमधील काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पूलमध्ये नाश्ता करताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमायराने इंस्टाग्रामवर तिचे बिकिनीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. या सगळ्या फोटोमधील तिचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या बोल्ड लूकवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (Amyra dastur shared photos in white bikini from Maldives vacation)

तिच्या या फोटोवर एका चाहत्याने “फिदा,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “हॉट फिगर बेबी,” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “देवाने मला नाश्ताचा ट्रे बनवावं.”

यासोबत तिने डीप डाईव्हचाही एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती पाण्याच्या आतमधील सौंदर्य दाखवत आहे आणि पोहण्याचा आनंद घेत आहे.

अमायराचे इंस्टाग्रामवर २.७ मिलियन एवढे फॉलोव्हर्स आहेत. त्यामुळे तिचे प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. ती पारंपरिक लूकपासून ते बोल्ड लूकपर्यंत सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अमायराने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आधी हिंदी चित्रपटात देखील काम केले होते. परंतु बॉलिवूडमध्ये तिला यश न मिळाल्याने तिने तिच्या अभिनयाच्या मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळवला. तिने ‘इश्क’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने सैफ अली खानसोबत ‘कालाकांडी’ या चित्रपटात काम केले. नंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: दुर्गा पूजेदरम्यान काजोल भावुक; काकांना मिठी मारत लागली रडू

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

हे देखील वाचा