Saturday, July 6, 2024

अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ चित्रपट, जो कधीच प्रदर्शित झाला नाही

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. नुकताच त्यांनी त्यांचा एक जुना फोटो इंस्टाग्राम वर शेयर केला आहे. फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहले आहे की, ‘हा फोटो अशा चित्रपटाचा आहे जो कधी बनूच शकला नाही’.
चित्रपटांच्या बाबतीत असे अनेकदा घडते की, चित्रपटांची घोषणा तर होते मात्र त्या चित्रपटाचे पुढे काहीच घडत नाही. अनेक मोठ्या कलाकारांना असा अनुभव येत असतो. अमिताभ बच्चन देखील याला अपवाद नाही.

अमिताभ यांनी अशाच एका चित्रपटाशी निगडित एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. परंतु त्यांनी नक्की कोणता चित्रपट याबद्दल कोणतीही जास्त माहिती सांगितली नाही. त्यांनी या फोटोला ‘एक असा सिनेमा जो कधी बानू शकला नाही, स्टाइल्ड, फोटोशूट, टाईटल्ड पण कधीच झाला नाही’ असे कॅप्शन दिले आहे.

 

त्यांनी शेयर केलेला फोटो हा त्यांच्या तरुणपणीचा आहे. ज्यात त्यांनी ग्रे रंगाचे फंकी जॅकेट परिधान केले असून त्यांच्याजवळ एक गन देखील दिसत आहे. खूप कमी वेळात त्यांच्या फॅन्सने त्यांच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. बऱ्याच लोकांनी त्यांना या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारले मात्र त्यांनी कोणतीही अधिक माहिती दिली नाही.
अमिताभ यांच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर सध्या ते कौन बनेगा करोडपती? कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनात व्यस्त आहे. लवकरच ते नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’, अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘चेहरे’ चित्रपटात दिसणार आहे.

हे देखील वाचा