Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड सुट्ट्यांचा आनंद घेऊन मुंबईत परतलेल्या रणबीर, आलियाचा अचानक एका वृद्धाने पकडला हात आणि…

सुट्ट्यांचा आनंद घेऊन मुंबईत परतलेल्या रणबीर, आलियाचा अचानक एका वृद्धाने पकडला हात आणि…

नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी आणि नवीन वर्ष अविस्मरणीय करण्यासाठी अनेक कलाकार मुंबईतून बाहेर गेले होते. यात अनेक कलाकारांच्या यादीत बॉलिवूडमधील सर्वात क्युट आणि प्रसिद्ध कपल असलेले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा देखील समावेश आहे. रणबीर आणि आलिया देखील त्यांचे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बाहेर गेले होते. नुकतेच ते पुन्हा मुंबईत परतले आहे. त्यांचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते एअरपोर्टवर आल्यानंतर बाहेर निघत असताना अचानक एका वृद्ध व्यक्तीने त्यांचा हात पकडला.

रणबीर आणि आलिया नुकतेच त्यांचे नवीन वर्ष साजरे करून मुंबईत परतले. ते मुंबईत आल्यानंतर त्यांचा एअरपोर्टवरचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून, या व्हिडिओमध्ये रणबीर आलिया चालत असताना अचानक एक वृद्ध मनुष्य रणबीर कपूरचा हात पकडतो. रणबीरचा हात पकडून तो व्यक्ती चालू लागतो, यादरम्यान रणबीर त्या व्यक्तीचे बोलणे ऐकत चालतो. आधी आलियाला गाडी बसवतो आणि मग त्या वृद्ध व्यक्तीचे पूर्ण बोलणे ऐकून तो स्वतः देखील गाडीत बसतो.

मागील बऱ्याच काळापासून रणबीर आणि आलिया नात्यात असून, त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या मीडियामध्ये लाइमलाईटमध्ये येत आहेत. काही बातम्यांनुसार हे कपल २०२१ मधेच लग्न करणार होते, मात्र कामाच्या कमिटमेंट्समुळे त्यांना हे शक्य झाले नाही. आता पुन्हा येणाऱ्या बातम्यांनुसार आलिया आणि रणबीर यावर्षी नक्कीच लग्न करणार असून, ते डेस्टिनेशन वेडिंग न करता मुंबईतच लग्न करणार आहे.

या दोघांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ते लवकरच अयान मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे. या दोघांसोबतच या सिनेमात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाड़िया, नागार्जुन अक्किनेनी आदी कलाकार देखील दिसणार आहे. या शिवाय रणबीर शमशेरा, एनिमल आदी सिनेमात दिसेल तर आलिया गंगूबाई काठियावाड़ी, आरआरआर, तख्त, रॉकी ​​और रानी की प्रेम कहानी आदी सिनेमात दिसेल.

हेही वाचा :

डिपनेक लाँग गाऊनमध्ये खुलले माधवी निमकरचे सौंदर्य, नवीन फोटो आले चर्चेत

दहा वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची सुपरबोल्ड निया शर्मा, फोटोमध्ये ओळखनेही आहे कठीण!

आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा