Monday, April 21, 2025
Home अन्य अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दणक्यात साखरपुडा संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दणक्यात साखरपुडा संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अखेर अंबानी कुटुंबातील धाकट्या मुलाचा साखरपुडा संपन्न झाला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी आज १९ जानेवारी रोजी दणक्यात साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याआधी अंबानी यांच्या घरी गोल, धना आणि चुनरीचा विधी पार पडला. यावेळेस दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना गिफ्ट्स देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर रिंग सेरेमनीच आयोजन झाले. या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी डान्स केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुंबईतील अंबानी निवास इथे या कार्यक्रमाची सुरुवात का विधीने झाली. या विधीनुसार अनंत अंबानींची भिन्न ईशा तिच्या परीवरील काही सदस्यांसोबत राधिकाच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण करून आली. त्यानंतर मर्चंट कुटुंब अंबानी यांच्याकडे आले तेव्हा मंत्रोच्चाराने त्यांचे स्वागत झाले. श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन सर्वानी गणेश पूजन सुरु केले. पुढे लग्नपत्रिकेचा पाठ झाला. त्यानंतर गोल धना आणि चुनरीचा विधी झाला. हा विधी गुजराती लोकांमध्ये साखरपुड्याच्या वेळेस केला जातो. यात लोकांना गूळ आणि धने दिले जातात. सोबतच गिफ्ट्स देखील देतात. आणि वधू पक्षातील लोकं वर पक्षासाठी मिठाई आणि गिफ्ट नेतात. या विधीनंतर अनंत आणि राधिका यांची साखरपुड्यातील रिंग सेरेमनी झाली. त्यांच्या साखरपुड्यानंतर संपूर्ण अमभनी कुटुंबाने राधिकाश मीडियाला पोज दिल्या. अंबानी हाऊसला अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तत्पूर्वी नीता आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा असलेल्या अनंत अंबानीने अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने त्यांच्याच व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. अनंत जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्ड सदस्यांमध्ये देखील होता. तर शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी असलेल्या राधिकाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पदवी संपादन केली असून, सध्या ती एनकोर हेल्थकेयरच्या बोर्ड निर्देशकपदी काम करत आहे. याशिवाय ती भरतनाट्यम या नृत्य प्रकारच्या प्रशिक्षित डान्सर देखील आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा