आज (१६ मार्च) टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या अनन्या खरेचा वाढदिवस. अनन्या यांची गणती त्या अभिनेत्रींनमध्ये होते ज्यांनी टीव्हीसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील त्याच्या अभिनयाचा आणि प्रतिभेचा ठसा उमटवला. तिने तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर सर्वांमध्ये आपली वेगळी छाप सोडली. आज अनन्याचा वाढदिवस त्या निमित्ताने जाऊन घेऊया तिच्याबद्दल काही माहिती.
अनन्या खरेचा जन्म १६ मार्च १९६८ रोजी मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये झाला. तिने तिच्या करियरची सुरुवात टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून केली. ८० च्या दशकात तिने ‘हम लोग’ आणि ‘निर्मला’ आदी शो करत तिची एक वेगळी ओळख निर्मण केली. तिचे ‘देख भाई देख’, ‘ये शादी नहीं हो सकती’ हे शो लोकांना खूप आवडले. ‘पुनर्विवाह’, ‘अमृत मंथन, ‘ये है आशिकी’, ‘मेरे अंगने में’, ‘लाडो 2’ या मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू लोकांना पाहायला मिळाला.
View this post on Instagram
टीव्हीसोबतच अनन्याने मोठ्या पडद्यावर देखील तिची छाप सोडली आहे. १९९४ साली ‘जालिम’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमधील तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर ती ‘शूल’मध्ये देखील दिसली. मात्र तिला खरी ओळख सात वर्षांनी आलेल्या ‘चांदणी बार’ सिनेमातून मिळाली. या सिनेमातील तिच्या दमदार अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यासोबतच ती ‘देवदास’ या सिनेमात देखील दिसली होती.
अनन्याने तिच्या करियरमध्ये बहुतकरून नकारात्मक भूमिकाच सर्वात जास्त साकारल्या. चित्रपट आणि टीव्हीसोबतच तिने ओटीटी माध्यमावर देखील काम केले आहे. २०२० साली तिने ‘बेबाकी’ नावाची एक वेबसिरीज केली होती. यात तिने बेनजीर अब्दुल्ला ही भूमिका साकारत लोकांकडून वाहवाही मिळवली होती. सध्या ती टेलिव्हिजनवर मालिकेमध्ये झळकताना दिसते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘असं’ जुळलं विनोदी अभिनेता राजपाल यादवचं राधाशी नातं, पहिल्या भेटीचा किस्सा केला शेअर
‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका










