Friday, July 5, 2024

बहिणीच्या लग्नातल्या ‘तो’ फोटो समोर आल्यानंतर अनन्या पांडे होते सोशल मीडियावर तुफान ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच मीडियामध्ये चर्चेत असते. या ना त्या कारणाने ती सतत मीडियाचे लक्ष वेधून घेत असते. मात्र बहुतकरून अनन्या ही तिच्या ट्रोलिंगमुळे गाजते. तिला नेहमीच नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतेच तिच्या आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल बोलले जात होते. आता पुन्हा एकदा अनन्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मात्र आता तिच्या ट्रोलिंगचे कारण खूपच धक्कादायक आहे.

सध्या अनन्या तिची बहीण असलेल्या अलाना पांडेच्या लग्नामुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. अलाना पांडे १६ मार्चला लग्न करणार असून तिचे लग्न सध्या मीडियामध्ये गाजत आहे. या लग्नाच्या प्री फंक्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. नुकतीच अलाना पांडेची मेहेंदीची सेरेमनी झाली. यावेळी अनेक स्टार्स हजर होते. सगळ्यांमध्ये अनन्याने सर्वात जास्त लाइमलाइट मिळवले. अलाना पांडे पेक्षा देखील अनन्या सुंदर दिसत होती. याचे अनेक फोटो व्हायरल झाले. मात्र यातच एक फोटो असा आहे जो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत तिला ट्रोल केले आहे.

अलाना पांडेच्या मेहेंदी कार्यक्रमात अनेक विदेशी पाहुणे आले आहे. यावेळी सर्वांमध्ये ती मस्ती करत होती. त्याच वेळी तिला सिगरेट पिताना स्पॉट केले गेले. याचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे. अनन्याचा हा फोटो अलाना पांडेचा होणारा नवरा आयवरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. हा फोटो व्हायरल होऊन त्यावर चर्चा सुरु होताच त्याने तो डिलीट केला. मात्र तोपर्यंत तो फोटो व्हायरल होत सगळीकडे पोहचला होता. हा फोटो समोर आल्यानंतर आता तिला जोरदार ट्रोल केले जात आहे.

या फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले, “खूपच हैराण करणारी बाब आहे. कारण ही तर हेल्थ कॉन्शस वाटायची” दुसऱ्याने लिहिले, “डोकं तर नाही या लोकांकडे फक्त कुल दिसायचे आहे.” अजून एकाने लिहिले, “जी गोष्ट जशी दिसते तशी कधीच नसते”, एकाने लिहिले, “अभिनय तर येत नाही कसला माज आहे कसला गर्व आहे बापाच्या जीवावर मजा मारायची.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी पैसा गमावला आहे’ नेटवर्थच्या प्रश्नावर हे काय बोलला कपिल शर्मा, ऐकून विश्वास बसणार नाही
Bhabiji Ghar Par Hai : मालिकेने गाठला मोठा टप्पा, कलाकारांनी प्रेक्षकांचे हात जोडून मानले आभार

हे देखील वाचा