अभिनेता अहान पांडे मंगळवारी २८ वर्षांचा झाला. ‘सैयारा’ या पहिल्याच चित्रपटातून एका रात्रीत स्टार बनलेल्या अहानवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच खास प्रसंगी त्याची सह-कलाकार अनीत पड्डाने (Aneeth Padda)शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर अनीतने इंस्टाग्रामवर अहानचे फोटो आणि व्हिडिओंची मालिका शेअर केली. या पोस्टमध्ये तिने अहानच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या संवेदनशील स्वभावाचे आणि माणुसकीचे मनापासून कौतुक केले. “मी भविष्य पाहिले आहे… तुमच्या हास्याने आजूबाजूचे लोकही हसतात. तुमचे डोळे जगातील साध्या गोष्टींमध्येही रंग भरतात,” असे भावनिक शब्द तिने कॅप्शनमध्ये लिहिले.
अनीतने अहानच्या कुटुंबाबद्दलही उल्लेख करत, त्याच्या आई-वडिलांचा त्याच्यावर असलेला अभिमान आणि विश्वास व्यक्त केला. “तुझ्या दयाळूपणावर, आत्म्यावर आणि तू ज्या व्यक्तीमध्ये घडलास त्यावर त्यांचा विश्वास आहे,” असे म्हणत तिने शेवटी, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अहान. मला तुझा खूप अभिमान आहे,” असे लिहिले.
अनीतच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या जोडीच्या मैत्रीचे आणि बॉन्डिंगचे कौतुक केले आहे. काही चाहत्यांनी त्यांच्या नात्याबाबत उत्सुकताही व्यक्त केली आहे. अहान आणि अनीतचा पहिला चित्रपट ‘सैयारा’ यंदा प्रचंड गाजला. या चित्रपटाने जगभरात ₹५०० कोटींपेक्षा अधिक कमाई करत सुपरहिटचा दर्जा मिळवला. ऑन-स्क्रीन जोडीला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर, ऑफ-स्क्रीनही दोघांमधील मैत्री चर्चेत आली आहे.चित्रपटाच्या यशानंतर अहान आणि अनीत हे खऱ्या आयुष्यातही जवळचे मित्र असल्याचे वारंवार दिसून येत आहे. अनीतची ही वाढदिवसाची पोस्ट त्याचाच पुरावा असल्याचे चाहते म्हणत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सलमान खानच्या वाढदिवसाला चाहत्यांना सरप्राइज? ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर 27 डिसेंबरला येण्याची चर्चा










