Monday, July 1, 2024

अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या सुखी संसाराला ३७ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर पडला शुभेच्छांचा पाऊस!

बॉलिवूडमधील दिग्गज आणि सदाबहार अभिनेता म्हणजे अनिल कपूर. अनिल कपूर आणि आणि त्याची पत्नी सुनीता कपूर यांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. ते आता त्यांच्या लग्नाचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहेत. तसं बघायला गेलं, तर बॉलिवूडमधील अनेकांची लग्नं जास्त काळ टिकत नाहीत. मात्र, अनिल कपूर आणि सुनीता कपूर हे बॉलिवूडमधील एक आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत. लग्नाच्या अनेक वर्ष आधीपासून ते एकमेकांशी डेट करत होते.

अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांचे लग्न 19 मे, 1984 मध्ये झाले आहे. त्यांच्या या सुखी संसाराला आता 37 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

अनिल कपूरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये काही नवीन तर काही थ्रोबॅक फोटो आहेत. हे फोटो शेअर करून त्याने त्याच्या पत्नीसाठी एक नोट लिहिली आहे.

अनिल कपूरने लिहिले आहे की, “आपल्या लव्ह स्टोरी समोर बाकी सगळ्या लव्ह स्टोरी लहान वाटतात. माझ्याकडून मला हे माहीत हे की, मी तुझ्यासोबत खूप सुरक्षित आणि खुश आहे. मी तुला आज वचन देतो की, मी तुझे आयुष्य प्रेमाने असे फुलवेल जस तू डिझर्व करतेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.”

सुनिता कपूर हिने इंस्टाग्रामवर एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “माझा वेडा पती. या अद्भुत 37 वर्षांसाठी खूप धन्यवाद. असेच माझे मनोरंजन करत राहा. अनंत काळापर्यंत प्रेम.” अनिल कपूरला त्याचे अनेक चाहते लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

सोनम कपूरने तिच्या आई- वडिलांना शुभेच्छा देताना लिहिले आहे की, “असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी मला अनुभूती होत नाही की, तुम्ही दोघे एकमेकांवर किती प्रेम करता. काहीही झालं तरीही आयुष्यात कुटुंब खूप महत्त्वाचं असतं हे शिकवल्याबद्दल धन्यवाद.”

सोनम कपूरने पुढे सांगितले की, “लग्नाचे 37 वर्ष आणि आधी 11 वर्ष डेटिंग आणि आता आयुष्यभराची साथ. मला तुमचे हे व्यक्तिगत गुण अंगिकारता‌ आले असते तर किती छान झाल असतं ना. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप खूप प्रेम.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुमच्या सारख्या माणसांनी या दुनियेला खरंच सुंदर आणि शांतीपूर्ण बनवलंय’, सोनू सूदने केली सीएसकेच्या ‘या’ खेळाडूची प्रशंसा

-‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-‘जीना नहीं मुझे हैं मरना’, म्हणत छतावर केला कुणाल खेमूने डान्स, मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

हे देखील वाचा