Saturday, June 29, 2024

मराठी भाषा दिनाच्या दिवशी आली अनिल कपूर यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण, पोस्ट शेअर करत म्हणाले…

लक्ष्मीकांत बेर्डे या नावातच सर्व काही सामावलेले आहे. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत देखील त्यांनी अतिशय उत्तम भूमिका मोठमोठ्या कलाकारांसोबत केल्या. त्यांची कीर्ती, त्यांचे काम आज ते आपल्यात नसूनही अजरामर आहे. मराठी सिनेसृष्टीत तर त्यांचे नाव सतत निघत असते, मात्र बॉलिवूड अभिनेत्यांना देखील त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नुकताच २७ फेब्रुवारी रोजी आपण मराठी भाषा दिन साजरा केला. या दिनाचे औचित्य साधत कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यातच बॉलिवूडमधील झकास अभिनेता असलेल्या अनिल कपूर यांनी देखील हटके पद्धतीने सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अनिल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर त्यांचा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो पोस्ट करत अतिशय सुंदर पद्धतीने कॅप्शन दिले आहे. अनिल कपूर यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “महाराष्ट्रातील सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने मला एक आठवण आली ती म्हणजे ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटाची. माझा हा आजपर्यंतचा पहिला आणि एकमेव मराठी चित्रपट. माझे भाग्य आहे की मला या चित्रपटात काम करायला मिळाले. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीतील उत्तम परफॉर्मन्स असणारा हा एक सिनेमा आहे. मला नेहमीच माझा मित्र असलेल्या लक्ष्मीकांतची आठवण येते.”

तत्पूर्वी अनिल कपूर यांनी लक्ष्मीकांत यांच्या हमाल दे धमाल या सिनेमात काम केले होते. त्यांचा हा एकमेव मराठी सिनेमा होता. या सिनेमात त्यांच्यासोबतच वर्ष उसगांवकर, निळू फुले, सुधीर जोशी, अशोक शिंदे आदी अनेक कलाकार होते. अनिल कपूर यांच्या या पोस्टवर लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलं असणाऱ्या अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांनी धन्यवाद म्हणत त्यांची पोस्ट रेपोस्ट केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाडं फुटलं रे! अखेर क्रितीने तिच्या सीक्रेट बाॅयफ्रेंडचा केला खुलासा, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

राजीवने चारुच्या वाढदिवशी केली अशी काही पाेस्ट की, युजर्स संतापूण म्हणाले, ‘कधी तुमचा घटस्फोट…’

हे देखील वाचा