हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन आज बरीच वर्ष झाली, मात्र ते गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी आजही भरून आलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ राजकीय नाही तर सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी खूप काम केले, त्यांना मदत केली. बाळासाहेब ठाकरे आणि चित्रपट यांचे नाते तर सर्वश्रुत आहे. आता चित्रपट म्हटले तर कलाकार ओघाने आलेच की. बाळासाहेब ठाकरे आणि सिनेसृष्टीतील कलाकार यांचे नाते सुद्धा खूपच सुंदर होते. हिंदी, मराठी कोणत्याही चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारा कलाकार बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आदरानेच घ्यायचा. त्यांनी प्रत्येक कलाकाराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत केलीच होती. त्यामुळे कलाकारांसाठी बाळासाहेब ठाकरे हे कोणत्याही देवापेक्षा कमी नव्हते. त्यामुळेच त्यांना नेहमीच बाळासाहेबांना देवाइतकेच महत्व दिले.
If FEARLESSNESS had a face, it certainly belonged to BalaSaheb. One of those leaders who inspired me through his sense of humour, humility and strength! He will call me and say, अरे अनिल! तुम्हारी नई फ़िल्म लगी है! अभी तक दिखाई नहीं?” Miss you #BalaSaheb! ???? pic.twitter.com/G4EkXRB8I2
— Anil Kapoor (@AnilKapoor) January 23, 2023
नुकतीच बाळासाहेबांची ९७ वी जयंती झाली. या जयंतीच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी त्यांना अभिवादन केले. बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जाणाऱ्या अनिल कपूर यांनी देखील ट्विटरवर बाळासाहेबांचा फोटो ट्विट करून लिहिले, “जर निर्भीडतेला चेहेरा असता तर तो खरोखर बाळसाहेबांचा असता. ते खूप कमी नेत्यांपैकी एक होते, ज्यांची विनोदबुद्धी, नम्रता आणि ताकद पाहून मला खूप प्रेरणा मिळायची. ते अनेकदा मला फोन करायचे आणि विचारायचे, अनिल! तुझा नवा सिनेमा प्रदर्शित झाला आहे, अजून मला तो दाखवला नाहीस तू. मिस यु बाळसाहेब.”
अनिल कपूर आणि बाळासाहेब यांचे नाते खूपच जुने आणि कौटुंबिक होते. तत्पूर्वी सध्या अनिल कपूर ‘द नाइट मॅनेजर’ या सिनेमामुळे तो सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री
केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ