Tuesday, July 9, 2024

कारकिर्दीच्या सुरुवातीला राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहायचा अनिल कपूर; पत्नी सुनीतामुळे बनला ‘सुपरस्टार’

बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेला अनिल कपूर हा अगदी खुल्या पुस्तकासारखा आहे. त्याचे आयुष्य कोणापासून लपलेले नाही. आज आम्ही तुम्हाला अनिल कपूरबद्दल असे काही तथ्य सांगणार आहोत, जे तुम्ही क्वचितच ऐकले किंवा वाचले असतील.

जरी आज अनिल कपूरने देश आणि जगात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण जेव्हा त्याचे कुटुंब मुंबईत आले, तेव्हा ते राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहायचे. मात्र, नंतर अनिल मध्यमवर्गीय भागात खोली भाड्याने घेऊन संपूर्ण कुटुंबासोबत राहू लागला.

अनिल कपूरचे वडील सुरेंद्र कपूर यांच्या समर्पणामुळे पुढे त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य चांगले झाले. सुरेंद्र कपूर हे चित्रपट दिग्दर्शक होते, म्हणून सुरुवातीपासूनच अनिलचा कल चित्रपटांकडे होता. अनिलने १९८० मध्ये तेलुगु चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट होता ‘वामसा व्रुक्षम.’ तथापि, अनिल यापूर्वी १९७९ मध्ये दिग्दर्शक उमेश मेहराच्या ‘हमारे-तुम्हारे’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसला होता.

त्यावेळी अनिल कपूर संघर्ष करत होता आणि अचानक त्याच्या आयुष्यात सुप्रसिद्ध मॉडेल सुनीता आली. सुनीताला पाहताच अनिल तिच्यावर फिदा झाला आणि तिला हृदय देऊन बसला. त्याला तिच्या जवळ जाण्याची इच्छा होती, परंतु त्याच्याकडे सुनीतापर्यंत पोहोचण्याचे कोणतेही माध्यम नव्हते. एकदा तिच्या मैत्रिणींनी सुनीताचा फोन नंबर अनिलला दिला. यानंतर दोघांचे बोलणे सुरू झाले. अनिल सुनीताच्या आवाजाचाही वेडा झाला होता. हिम्मत करून अनिलने सुनीतासमोर डेटवर जाण्याचा प्रस्ताव मांडला. सुनीतानेही तो आनंदाने स्वीकारला.

यानंतर दोघेही बस आणि टॅक्सीने फिरायला जाऊ लागले. त्यावेळी प्रसिद्ध मॉडेल असूनही सुनीता बसमध्ये फिरायची. अनिल अजूनही स्ट्रगल करत होता, त्यामुळे सुनीताच अनिलचा संपूर्ण खर्च उचलत असे. अखेर अनिलने तिला प्रपोज केले आणि हे प्रकरण लग्नापर्यंत आले. अनिललाही चित्रपट मिळू लागले होते आणि १९८४ च्या ‘मशाल’ या चित्रपटातून त्याला खूप ओळख मिळाली. या दोघांच्या लग्नाला त्यांच्या घरच्यांचा आक्षेप नव्हता, पण अनिलच्या बॉलिवूड मित्रांचा आक्षेप मात्र होता. त्याने अनिलला सल्ला दिला की, लग्नानंतर त्यांची कारकीर्द संपू शकते. यामुळे दोनदा लग्नाची तारीख पुढे ढकलली गेली.

सुनीताला बराच काळ डेट केल्यानंतर २९ मे, १९८४ रोजी दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नानंतर सुनीताने अनिलच्या कारकिर्दीला स्वतःची कारकीर्द म्हणून स्वीकारले. तिने मॉडेलिंग सोडून घर सांभाळले आणि अनिलला साथ दिली. ती अनिलसाठी ड्रेस डिझाईन करण्यापासून ते शूटिंगसाठी त्याच्यासोबत परदेशातही जायची. तिच्यामुळे अनिल सुपरस्टार बनला. १९८७ मध्ये दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात अनिल कपूरच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले आणि हा चित्रपटही सुपरहिट ठरला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टीव्ही जगातल्या ‘दादी’ सुरेखा सिक्री यांनी विविध भूमिकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं! एकेकाळी उपचार घेण्यासाठीही नव्हते पैसे 

-‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

-सर्किट होणं सोप्पं नव्हतं भाऊ! चौदाव्या वर्षीच आई-बापाचे छत्र हरपलेल्या अर्शद पुढे असा झाला सुपरस्टार

-‘तुम्ही तुमचे काम करा’, फिरोज खान यांचे शब्द ऐकताच अभिनेते राजकुमार झाले होते रागाने लालेलाल, दिली होती ‘ही’ धमकी

हे देखील वाचा