‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून राधिका म्हणून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अनिता दाते आता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून मालिकेचे ‘नाव नवा गडी नवं राज्य’ असं नाव आहे. झी मराठीवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
प्रोमोमध्ये दिसलंय की, अनिता ही मृत्यू झालेल्या रमाची भूमिका करणार आहे. पण ती तिच्या फोटोतून बोलत आहे. या मालिकेत अनिताबरोबर कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील, वर्षा दांदळे हे कलाकार देखील असणार आहेत. बालकलाकार साईशा भोईर देखील प्रोमोमध्ये झळकली आहे. ही मालिका ८ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता प्रदर्शित होणार आहे.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)










