टेलिव्हिजन तसेच बॉलिवूडमध्ये काम करताना कलाकारांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. अनेकजण या परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात ,पण काही मात्र डिप्रेशनमध्ये जातात. अशातच टेलिव्हिजन अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने खुलासा केला आहे की, इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला तिने डिप्रेशनचा सामना केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला अपयश आल्याने तिच्यावर नकारात्मक परिणाम झाला होता. तेव्हा एकता कपूरने तिची मदत केली होती. अनिताने एकता कपूरच्या ‘कभी सौतन कभी सहेली’ या मालिकेत काम केले होते. यामधून तिला खूप लोकप्रियता मिळाली.
यानंतर तिने ‘कुछ तो है’ आणि ‘ये है मोहब्बते’ या मालिकेत काम केले. तिने लोकप्रिय मालिका ‘नागीण ३’ मध्ये देखील काम केले आहे. तिने सोमवारी (८ नोव्हेंबर) रोजी एकता आणि तिचा पती रोहितसोबत एक सेल्फी शेअर करून लिहिले की, “एकता!, तू जे स्ट्राँग फिमेल चरित्र बनवले आहे. तू त्याची प्रोटोटाईप आहेस. तू एक खरी मैत्रीण आणि स्वतःच्या मतावर ठाम असणारी महिला आहेस. इतक्या वर्षांची आपली मैत्री आता एका घरगुती नात्यामध्ये बदलली आहे. जिथे आपण दोघी काहीही प्रश्न न विचारता एकामेकींसाठी सगळं काही करू शकतो.” (Anita hassanandani praised ejra kapoor and her husband by posting said helped in fighting depression)
तिने पुढे लिहिले की, “मला ते दिवस आठवतात जेव्हा मी तरुण होते आणि मला काम करण्याची भूक होती. परंतु प्रत्येक गोष्टीशी मी अपरिचित होते. करिअरच्या सुरुवातीला माझ्या अपयशामुळे माझ्यावर नकारात्मक प्रभाव झाला होता. नंतर तू माझ्या आयुष्यात आलीस. तू केवळ मला डिप्रेशनमध्ये लढण्याची ताकद दिली नाही, तर मला एक नवीन सुरुवात करून दिली. कधीही हार मानायची नाही. ही गोष्ट मी तुझ्याकडून शिकले.”
अनिताने पुढे लिहिते की, “कठीण प्रसंगात मी तुझ्यामुळे स्वतःला सुरक्षित समजते. माझ्या आयुष्याची नियती. तिला केवळ माझी मैत्रीण म्हणणे बरोबर नाही. ती माझ्या कुटुंबाचाचा एक भाग आहे.”
अनिता तिच्या पतीसाठी लिहिते की, “रोहित! सगळ्यात क्यूट डिंपलसोबत माझा प्रिय पती. आता तो एक सुपर डॅड देखील आहे. तो माझ्यासोबत माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगल्या आणि वाईट प्रसंगात राहिला आहे. रोहितने प्रत्येक प्रसंगात माझा हात धरला आहे. आम्ही अनेक आनंदाचे क्षण अनुभवले आहेत. जे कायम स्वरुपी माझ्या हृदयात आहेत. मी जेव्हापासून रोहितवर प्रेम करत आहे, तेव्हापासून प्रत्येक गोष्टीत त्याने मला पाठिंबा दिला आहे. मला माहित आहे की, तो नेहमीच माझ्यासोबत असणार आहे. रोहित माझ्यासाठी एक खास व्यक्ती आहे.”
अनिताने काही महिन्यांपूर्वी एका गोड मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे तिने तिच्या कामातून ब्रेक घेतला आहे. ती तिचा सगळा वेळ आता तिच्या मुलासोबत घालवत आहे. अनेकवेळा तिच्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-