Wednesday, July 3, 2024

प्रसिद्ध अभिनेत्रीने केला कास्टिंग डायरेक्टर्सबद्दल हैराण करणारा खुलासा; म्हणाली, ‘ते टॅलेंट नाही, तर ‘हे’ बघतात’

ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या गुणवत्तेच्या जोरावर प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अंजली बरोट (Anjali Barot) लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टारची वेब सिरीज ‘शूरवीर’मध्ये (Shoorveer) झळकणार आहे. या वेब सिरीजमध्ये ती सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी तिने ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ (Scam 1992: The Harshad Mehta Story) या वेब सिरीजमधील तिच्या अभिनयामुळे वाहवा मिळवली होती.

अंजली बरोटच्या अभिनयावर आई-वडिलांची प्रतिक्रिया
अंजलीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तिचा वैयक्तिक अनुभव सांगितला आहे. तिने सांगितले की, जेव्हा तिने अभिनयाची आवड तिच्या आई-वडिलांना सांगितली, तेव्हा त्यांनी तिला खूप आधार दिला आणि तिच्या निर्णयाची प्रशंसा देखील केली. पुढे अंजलीने हे देखील सांगितले की, ती पहिल्यांदाच सैनिकाची भूमिका निभावनार असल्याने तिला गर्व होत आहे आणि भीतीही वाटत आहे कारण, यातून ती देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे. (anjali barot revealed casting directors reality)

अंजली बरोटने केला कास्टिंग डायरेक्टर्सबद्दल खुलासा
याच मुलाखतीत तिने कास्टिंगच्या वेळी आलेल्या वाईट अनुभवाबद्दलही सांगितलं. तिने सांगितले की, आजकाल कास्टिंग डायरेक्टर्स काय पाहुन कास्ट करतात? ती म्हणाली की, “कास्टिंग डायरेक्टर्स टॅलेंट बघत नाहीत, तर सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत ते पाहतात. काही चांगलेही कास्टिंग डायरेक्टर्स आहेत, पण लोकांना सोशल मीडिया फॉलोअर्सच्या आधारावर रोल्स मिळत आहेत. मला हे पटत नाही. पण आजही काही डायरेक्टर्स टॅलेंट पाहतात.”

कधी रिलीझ होणार ‘शूरवीर’?
अंजली बरोटची वेब सिरीज ‘शूरवीर’ १५ जुलै २०२२ला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीझ होणार आहे. याच्या ट्रेलरला तर प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे, आता वेब सिरीजला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहूया.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा