‘उड़ारियां’ मालिकेपासून ते ‘बिग बॉस 16’च्या घरापर्यंत अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी आणि अभिनेता अंकित गुप्ता यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या जोडीने बिग बॉसच्या घरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली. त्यांनी कधीच त्यांचे नाते जगासमोर कबूल केले नाही. मात्र सर्वांनाच माहित आहे, त्यांच्यात कोणते नाते आहे ते. त्यांच्यात असलेले प्रेम कधीच लपून राहिलेले नाही. त्यांच्या जोडीला देखील मोठी फॅन फॉलोविंग आहे. त्या सर्वच फॅन्सची त्यांना कायम एकत्र बघण्याची मोठी इच्छा आहे. त्यांच्या फॅन्सने त्यांना ‘प्रियांकित’ असे नाव देखील दिले आहे. त्यांनी लवकर लग्न करावे असे देखील सर्वाना वाटत आहे. अशातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही लग्नाच्या पोशाखात दिसत आहे. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगत आहे.
View this post on Instagram
थांबा थांबा त्या दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्न केलेले नाही. त्यांनी एका म्युझिक व्हिडिओमध्ये एका कपलची भूमिका साकारली आहे. तयच व्हिडिओमध्ये त्यांनी लग्न केल्याचे देखील दाखवले जाणार आहे. खऱ्या आयुष्यात फॅन्सला त्यांचे लग्न कधी बघता येईल माहित नाही, मात्र रील आयुष्यात त्यांना त्यांचे आवडते कपल लग्नबंधनात अडकताना पाहता येणार आहे. या दोघांचा प्रदर्शित झालेला ‘कुछ इतने हसीन’ हा म्युझिक व्हिडिओ सध्या तुफान गाजत आहे. त्यांना एकत्र पाहून त्यांच्या सोबतच इतरही प्रेक्षक खुश आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून त्यांना लवकर खऱ्या आयुष्यात लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.
जेव्हा अंकित आणि प्रियांका एकत्र ‘उड़ारियां’मध्ये काम करत होते, तेव्हाच बातम्या येत होत्या की ते एकमेकांना डेट करत आहे. याच कारणामुळे अंकित आणि प्रियांका यांनी एक कपल म्हणून बिग बॉस १६च्या घरात प्रवेश केला. या घरात या दोघांनीही एकमेकांना खूप साथ दिली. मात्र त्यांनी नेहमीच एकमेकांना ते चांगले मित्र असल्याचे सांगितले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
ये है मोहब्बतें फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, गोव्यात मोठ्या दणक्यात केले लग्न