Monday, July 1, 2024

अंकिता अन् विकीच्या नात्याला झाली ३ वर्षे पूर्ण, शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

छोट्या पडद्यावर पाऊल ठेवून खूप कमी वेळात प्रसिद्धी मिळवणारे कलाकार खूप कमी असतात. यात समावेश होतो तो म्हणजे पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे हिचा. अंकिताने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजही तिचे स्थान प्रेक्षकांच्या मनात आढळ आहे. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती मोठ्या प्रमाणात लाईमलाईटमध्ये आली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबतच्या तीन वर्षांच्या रिलेशनशीपचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

अंकिता लोखंडे ही विकी जैनसोबत नेहमीच तिच्या प्रेमाचा खुलासा करताना दिसते. ती नेहमीच अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करून त्यांच्या प्रेमाबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत एक सोशल मीडियावर पोस्ट करून, त्यांच्या रिलेशनशिपला तीन वर्ष पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.

अंकिताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये विकी जैनसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘मेरे दिल मे जगह खुदा की खाली थी’ या गाण्यावर रोमांटिक डान्स केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत अंकिताने असे कॅप्शन दिले आहे की, “आम्ही एकत्र येऊन 3 वर्षेे झाली.”

अंकिता आणि विकीचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकून खूपच लाईक्स मिळत आहेत. काहीजण त्या दोघांच्या जोडीचे कौतुक करत आहेत, तर काहीजण सुशांत सिंगचे नाव काढून त्याची आठवण करून देत आहे. यातच काहीजण तिला ती लग्न कधी करत असल्याचे विचारत आहेत.

याआधी देखील अंकिताने विकीसोबत होळीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर एक भली मोठी पोस्ट देखील लिहिली होती. त्यात तिने त्याचे खूप कौतुक केले होते आणि विकी तिचा सगळ्यात मोठा सपोर्ट असल्याची माहिती देखील दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘वा वा वा!’ छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्माने केला ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स, म्हणाली ‘क्लब बंद…’

-फिल्मफेअर अवॉर्डकडे पाहून मराठमोळ्या रितेश देशमुखने दिले भन्नाट एक्सप्रेेशन्स, पाहून तुम्हीही हसून हसून व्हाल लोटपोट

-‘बिग बॉस’चा माजी कंटेस्टेंट सिद्धार्थ शुक्लाने साधला पाकिस्तानी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा, म्हणाला ‘वा रे वा…’

हे देखील वाचा