यंदाच्या लग्नाच्या मौसमात टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात हॉट आणि गुडलुकिंग कपल अंकिता आणि विकी लवकरच लगीनगाठ बांधणार आहे. २०२१ चा डिसेंबर महिना अंकितासाठी खूपच खास आहे, एकतर हा महिना तिचा बर्थ मंथ आहे आणि दुसरे म्हणजे याच महिन्यात ती तिच्या नवीन आयुष्याची सुरूवात करणार आहे. याचमुळे या महिन्यात तिचे डबल सेलिब्रेशन असणार आहे. अंकिता तिच्या लग्नासाठी खूपच उत्साही असून तिने काही दिवसांपूर्वीच तिच्या गर्ल गॅंगसोबत बॅचलर पार्टी देखील केली. आता अंकिताच्या प्रीवेडींग सेलिब्रेशनला सुरूवात झाली असून, याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अंकिता आणि विकीने त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत त्यांच्या लग्नाचे प्रीवेडींग सेलिब्रेशन केले आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये शेअर केले असून, यात अंकिता आणि विकी हे फंक्शन एन्जॉय करताना दिसत आहे. या प्रीवेडींगच्या पार्टीमध्ये अंकिताने गोल्डन लेस असलेली शिमरी साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज घातले असून, यासोबत तिने नाजूक आणि आकर्षक असा चोकरचा नेकपीस आणि इयरिंग्स देखील घातले आहे. तिने तिचा हा लूक अतिशय लाईट आणि लक्षवेधी असा ग्लॉसी मेकअप करून पूर्ण केला आहे. यासोबतच तिने तिचे केस वर बांधले आहेत. तर विकीने ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे. दोघेही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करताना दिसत आहे. अंकिता आणि विकीमध्ये असणारे प्रेम हे अंकिताच्या प्रत्येक सोशल मीडियावरील पोस्टमधून दिसून येते.
अंकिता आणि विकी यांच्या लग्नाचे फंक्शन १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान होणार असल्याचे समजत आहे. यात हळद, संगीत, एंगेजमेंट आणि लग्न असे सर्व फंक्शन होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिता आणि विकीला लग्नाचे आमंत्रण देताना देखील पाहिले गेले. अंकिताने तिच्या लग्नासाठी भरपूर तयारी केली असून, लग्न अविस्मरणीय होण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–टेलिव्हिजन विश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी निवडला दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारा जोडीदार
–लग्नाच्या नुसत्या नावाने देखील चिडायची काजोल, मात्र अजयला भेटल्यानंतर बदलले विचार