Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड सुशांत सिंग रजपूतवरुन उठसुठ ट्रोल करणाऱ्यांना अंकिता लोखंडेने दिले सडेतोड उत्तर

सुशांत सिंग रजपूतवरुन उठसुठ ट्रोल करणाऱ्यांना अंकिता लोखंडेने दिले सडेतोड उत्तर

पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आपल्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक जीवनातील अनेक प्रसंगांनामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतरही अनेक प्रेक्षक तीला बरे‌ वाईट बोलत असतात. या ट्रोलींगमुळे अंकिता अक्षरशः कंटाळली आहे. या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी तिने नुकतेच एका लाईव्ह मीटिंगचे आयोजन केले होते. त्यात ती सुशांतच्या चाहत्यांना अशी विनंती करत आहे की, माझी इमेज खराब नका करू. यावेळी अंकिताने असे म्हंटले आहे की, ” ज्या गोष्टी मला आवडत नाही, त्या मी करत नाही, पण निदान मी अस दुसऱ्यांच्या अकाउंटला जाऊन त्यांना शिव्या तरी देत नाही.”

या लाईव्ह मीटिंगच्या दरम्यान अंकिताने आपल्या सगळ्या समस्या प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. तिने सांगितले की, “जेव्हा सोशल मीडियावर तिला वाईट कमेंट येतात तेव्हा तिला खूपच वाईट वाटते आणि या सगळ्याचा परिणाम तिच्या कुटुंबावर पडतो. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती करत आहेत की, मला कोणीही जज नका करू, कारण पूर्ण कहाणी कोणालाच माहीत नाहीये.” यामध्ये तिने असे देखील म्हटले आहे की, सुशांत सोबतच तिच्या नात्याबद्दल ज्या लोकांना माहीत नाहीये ते लोकही आज तिला दोषी ठरवत आहे. जे की तिने काहीच चूक केलेलं नाही.

अंकिता अनेकवेळा आपल्या डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यावर प्रेक्षक तिला काही अपशब्द वापरून कमेंट करतात. यावर ती म्हणते की, “जर तुम्हाला माझ्या सोशल मीडियावरवरील पोस्ट आवडत नसतील तर तुम्ही मला अनफॉलो करू शकता. मला ट्रोलींगने काहीही फरक पडत नाही, पण या सगळ्याचा परिणाम माझ्या कुटुंबावर होत आहे.”

या व्हिडिओमध्ये अंकिता सुशांत सोबत असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगते की,” जे लोक आज मला बोलत आहेत, त्यांना खरतर आमच्या नात्याबद्दल काहीच माहीत नाहीये. तुम्हाला जर एवढंच वाटत ना आमच्याबद्दल, तर तुम्ही आधी कुठे होते, जेव्हा आमच्यातील सगळ काही संपत चाललं होतं. पण आता तुम्ही सगळे मला ब्लेम करतात, पण या सगळ्यात माझी काही एक चूक नाहीये.” सुशांत सिंगच्या मृत्यूनंतरच अंकिताकडे सगळेजण खूप लक्ष द्यायला लागले आणि तिला ट्रोल करायला लागले. पण या सगळ्यांवर अंकिताने अगदी सडेतोड उत्तर दिले आहे.

हे देखील वाचा