Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लपून छपून उरकला मेहेंदीचा कार्यक्रम, अंकिता लोखंडे लवकरच अडकणार लग्नबंधनात? पाहा मेहेंदीचे फोटो

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे बातम्यांमध्ये येतच असते. कधी ती सुशांतसोबतचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करून चर्चेत असते, तर कधी ट्रोलिंगमुळे, कधी तिच्या बॉयफ्रेंड सोबतच्या फोटोंमुळे. आता सुद्धा अंकिता तिच्या सोशल मीडियावरच्या फोटोंमुळेच चर्चेत आहे, मात्र हे फोटो जरा वेगळे आहे.

अंकिताने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले आहे. या फोटोंमुळे अंकिताच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अंकिताने तिच्या अकाऊंटवरून तिच्या मेहेंदीचे काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केले आहे. यात तिच्या हाताला मेहेंदी लावलेली दिसत असून तिच्या चेहेऱ्यावर प्रचंड आनंद दिसत आहे.

या फोटोंवरून अंकिता आणि तिच्या बॉयफ्रेंड विकी जैन यांच्या लग्नाबद्दलच्या बातम्या येत आहेत. अतिशय साध्या लूकमध्ये दिसत असून तिने फुलांचे दागिने देखील घातले आहेत. हे फोटो पाहून अंकिताच्या फॅन्सने तिला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.

अंकिताच्या बहिणीने अशिताने देखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात अंकिताच्या हातांना मेहेंदी लावली जात आहे. अंकिता आणि अशिता या आनंदाने एकमेकींना मिठी देखील मारत आहे. मात्र काही लोकांनी अंकिताचे हे फोटो आणि व्हिडिओ जुने असल्याचे सांगितले तर काहींनी हे व्हिडिओ अंकिता आणि विकीच्या साखरपुड्याचे आहे असे सांगितले आहे. दरम्यान सध्या मनोरंजाच्या क्षेत्रात लग्नाचे वारे वाहत आहेत. बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधल्या अनेक जोड्या नवीन वर्षाचा मुहूर्त साधत लगीनगाठ बांधत आहे. त्यामुळे अंकिता आणि विकी देखील लग्न करणार का ? हे पाहणे नक्कीच महत्वाचे ठरेल.

तत्पूर्वी अंकिता आणि विकी हे मागील काही काळापासून एकमेकांना डेट करत आहे. त्यांचा साखरपुडा झाला असून तिच्या फॅन्सला तिच्या आणि विकीच्या लग्नाची उत्सुकता आहे. सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, मात्र काही वर्षांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. सुशांतने १४ जून २०२० ला त्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती, त्यामुळे अंकिता पूर्णपणे कोलमडली होती. अंकिताने नुकतेच सुशांतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशांत आणि तिचे काही फोटो, व्हिडिओ शेयर केले होते.

हे देखील वाचा