Tuesday, July 9, 2024

विकी जैनसोबत सुट्ट्या एन्जॉय करत असलेल्या अंकिता लोखंडेने पोस्ट केले ब्लॅक मोनोकिनीमधील मादक फोटो

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असून, तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अंकिता बऱ्याच वेळा तिचे फोटो आणि डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी अनेकदा संवाद देखील साधत असते. असे असले  तरीही मागील काही काळापासून ती सतत ट्रोल होत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यनंतर अंकिता जास्तच ट्रोल व्हायला लागली. अंकिता सध्या सुशांतच्या फॅन्सच्या रडारवरच आहे. त्यामुळेच ती नेहमी चर्चेत असते. सध्या अंकिता पुन्हा चर्चेत आली आहे, त्याचे कारण म्हणजे तिने पोस्ट केलेले फोटो.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अंकिता स्विमिंग पूलमध्ये असून तिने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. धुक्यात हरवलेल्या स्विमिंग पूलमध्ये अंकिता अतिशय मादक दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “इतकेही सोपे नका राहू, की कोणी सहज तुम्हाला ओळखेल, त्यांना जरा शोध तर घेऊ द्या.”

https://www.instagram.com/p/CLYcN82Lwrd/?utm_source=ig_embed

अंकिता सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिथेच तिने तिच्या बॉयफ्रेंड विकी जैनसोबत व्हॅलेंटाईन डे देखील साजरा केला आहे. तिने तेथील सुट्यांचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटो आणि व्हिडिओला तुफान लाईक्स मिळत आहेत.

अंकिताच्या या फोटोमुळे ती ट्रोल देखील होत आहे. सुशांतचे चाहते तिला जबरदस्त ट्रोल करत आहे. एक युझर म्हणतोय, “सुशांतच्या नावावर खूप प्रसिद्धी मिळवत आहेस.” तर दुसरा युजर म्हणाला, “तुझ्याकडे इन्स्टापोस्ट करण्याशिवाय दुसरं काही काम नाही. थोडी तर लाज वाटू दे.”

अंकिता आणि विकी मागच्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. याआधी ती सुशांत सिंग राजपूतसोबत सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांचे ब्रेकअप झाले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा
पाहा  मोहब्बते फेम किम शर्मा आज दिसतेय तरी कशी, बिकीनीत होतायत फोटो व्हायरल
सोनू के टीटू की स्वीटी मधली ही अभिनेत्री तिच्या हॉटनेसने लावत आहे चाहत्यांना वेड, एकदा तुम्हीही पाहून घ्या तिचे घायाळ करणारे फोटो
बालिका वधूची आनंदी आता दिसतेय अशी! पहा तिचे घायाळ करणारे फोटो!

हे देखील वाचा