Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड कधीही न पाहिलेले व्हिडीओ! सुशांतच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंकिताने शेअर केले दोन व्हिडीओ

कधीही न पाहिलेले व्हिडीओ! सुशांतच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंकिताने शेअर केले दोन व्हिडीओ

गुरुवारी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच वाढदिवस होता. २१ जानेवारी १९८६ ला सुशांतचा जन्म झाला. ह्यावर्षी मात्र सुशांतच्या वाढदिवसाला दुःखाची किनार आहे. ह्यावर्षी तो त्याचाच वाढदिवस साजरा करायला या जगात नाहीये. सुशांतचा वाढदिवस त्याच्या फॅन्सने ‘सुशांत डे’ म्हणून साजरा करायला सुरुवात केली. आज सुशांतला सर्वच जण त्याला शुभेच्छा देत आहे. त्यात कलाकार देखील मागे नाही. कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतला शुभेच्छा देत आहे.

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या अंकिताने देखील सुशांतचे दोन व्हिडिओ पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिताने पहिला व्हिडिओ सुशांत आणि त्याचा डॉगी स्कॉच यांचा आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या डॉगीसोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, “कसे सुरू करावे आणि काय बोलावे हे मला माहित नाही परंतु हो आज मी सुशांतचे काही जुने व्हिडिओ शेयर करणार आहे. तुझ्यासोबत असणाऱ्या या माझ्या आठवणी आहेत. मी नेहमीच अशाच प्रकारे तुला आठवणार आहे. खूश, हुशार, रोमँटिक, वेडा आणि मोहक. #HappyBirthdaySSR ”

अंकिताने दुसरा व्हिडिओ सुशांतच्या डान्सचा शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत शाहरुख खानच्या ‘तू हैं मेरी किरण’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेयर करताना अंकिताने लिहिले, ‘ तूच खरा शाहरुख खानचा फॅन आहेस. तू जिथे कुठे असशील तिथे नेहमी हसत राहा. हॅप्पी बर्थडे सुशांत”

सुशांत आणि अंकिताची पहिली भेट ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेत हे दोघे नायक आणि नायिका साकारत होते. या दोघांना या मालिकेने खूप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली.या मालिकेच्या दरम्यान या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मालिकेनंतरही अनेक वर्ष हे दोघं नात्यात होते. तब्बल ८ वर्ष हे दोघं नात्यात होते. मात्र २०१६ साली त्यांचे ब्रेकअप झाले.

तत्पूर्वी सुशांतने १४ जून २०२० ला राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण आजही समोर आलेले नाही.

हे देखील वाचा