Monday, July 1, 2024

‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

टेलिव्हिजनवरील ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ही घराघरात पोहचली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग बॉलिवूडच्या एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. अंकिता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना इंप्रेस करण्याची एकही संधी ती सोडत नाही. नवनवीन गोष्टी चाहच्यांसाठी ती नेहमीच शेअर करत असते. अशातच अंकिताने एका खास व्यक्तीसोबत फोटो शेअर केले आहेत.

अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तृतीयपंथी पूजासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये पूजाने पिवळ्या रंगाची साडी आणि अंकिताने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे. या फोटोमधून त्या दोघींमध्ये असलेला बाँड दिसत आहे. यात त्या दोघीही खूप सुंदर आणि खुश दिसत आहे. (Ankita Lokhande share a photo with special person)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “पूजा दीदी तू खूप खास आहे. तुझी सकारात्मक ऊर्जा आणि स्माईल सर्वत्र पसरवल्याबद्दल खूप धन्यवाद.” याआधी देखील अंकिताने पूजाला घरी बोलावले होते. तेव्हा त्यांनी डान्स देखील केला होता. तिने आता शेअर केलेल्या फोटोंना जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

अंकिता लवकरच ‘पवित्र रिश्ता २.०’ मध्ये देखील असणार आहे. या मालिकेत ती पुन्हा एकदा अर्चनाचे पात्र निभावणार आहे. तर मानवचे पात्र अभिनेता शाहीर शेख निभावणार आहे. या शोची शूटिंग देखील सुरू झाली आहे. हा शो प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यास मिळणार आहे.

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांचे मानव आणि अर्चना नावाचे पात्र खूप गाजले होते. यानंतर अंकिताने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. तिने ‘मनिकर्णिका‌’या चित्रपटात काम केले. तसेच ती ‘बागी ३’ मध्ये देखील दिसली होती. या चित्रपटात तिने श्रध्दा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुखसोबत काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ताहिराला येतेय पती आयुष्मानची आठवण; म्हणाली, ‘मला सर्वांसमोर प्रेम दाखवण्याचा शौक नाही, पण आम्ही…’

-‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

-ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…

हे देखील वाचा