Wednesday, June 26, 2024

अंकिता लोखंडेने रोमॅंटिक अंदाजात केले नव्या वर्षाचे सेलिब्रेशन; काळ्या आउटफिटमध्ये कमाल दिसतेय अभिनेत्री

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही टेलिव्हिजन क्षेत्रातील मोठे नाव आहे. मागच्या वर्षीच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी धुमधडाक्यात लग्न केले. तर अलिकडेच या नवविवाहित जोडप्याने खास अंदाजात या नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. लग्नानंतर या दोघांचे नवे वर्ष साजरे करण्याची ही पाहिलीच वेळ आहे. अशामध्ये सेलिब्रेशन धमाकेदार असणार यात शंकाच नाही!

या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यांना चाहत्यांचीही भरभरून पसंती मिळत आहे. खरं तर हे फोटो आणि व्हिडिओ अंकिताने स्वत: तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. (ankita lokhande share romantic photos with husband vicky jain)

यात तुम्ही पाहू शकता की, दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. अंकिता काळ्या रंगाचा लॉंग स्लीव्हलेस गाऊन घातला आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे विकीनेही पांढरी डिझाईन असलेले काळे स्वेटशर्ट घातले आहे, ज्यात तो देखील बऱ्यापैकी देखणा दिसत आहे.

या नव्या वर्षाची सुरुवात दोघांनी अगदी रोमँटिक पद्धतीने केलेली पाहायला मिळाली. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसले. केवळ चाहतेच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटींनी या फोटो आणि व्हिडिओला पसंती दर्शवली.

अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहचली. त्यानंतर तिने कंगना रणौतच्या ‘माणिकर्णिका’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात अंकिता सहाय्यक भुमिकेत होती, यातील तिच्या अभिनयाने देखील बरीच वाहवा मिळवली. त्यानंतर ती ‘बागी ३’मध्ये दिसली.

हेही वाचा-

हे देखील वाचा