Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड अरे बापरे! अंकिता लोखंडेला नक्की झाले काय ‘भाड में गया ए प्यार व्यार’ म्हणायला?

अरे बापरे! अंकिता लोखंडेला नक्की झाले काय ‘भाड में गया ए प्यार व्यार’ म्हणायला?

हिंदी टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. अंकिता तिच्या फोटो आणि इंस्टाग्रामवरील मजेशीर रिल्समुळे कायम प्रकाशझोतात येत असते. अलीकडेच अंकिताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो इंटरनेटच्या जगात वेगाने व्हायरल होत आहे.

अंकिताने टेलिव्हिजन माध्यमातून तिच्या मालिकेतून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. आता बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय झालेल्या अंकिताचा फॅन फॉलोविंग देखील खूप तगडा आहे. सध्या ती पवित्र रिश्ता मालिकेच्या ओटीटीवरील दुसर्‍या पर्वामध्ये दिसत आहे. या मालिकेत आधी अभिनेता सुशांत सिंग राजपूत काम करत होता, मात्र आता त्याची मानव ही भूमिका अभिनेता शाहीर शेख निभावत आहे. पवित्र रिश्ताच्या पहिल्या पर्वात अंकिता आणि सुशांत सिंग राजपूतची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली होती.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अंकिताने इंस्टाग्रामवर तिचा एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जणं विचारत पडले आहे. अंकिताने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि काजल अग्रवाल यांच्या ‘मारी’ चित्रपटातील ‘भाड में गया ए प्यार व्यार, ए लव वव का कॅरेक्टर अपून को सुट नहीं करता’ या डायलॉगवर लिपसिंग करताना दिसते आणि डायलॉग संपल्यावर लगेचच ‘ब्राऊन मुंडे’ या पंजाबी गाण्यावर नाचते आहे. व्हिडिओत अंकिताने ब्राऊन रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला असून, तिचा गॉगल घालून दिसलेला लूक सर्वांचं आवडत आहे. हा व्हायरल व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला असून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओला प्रतिक्रिया देताना एका युजरने ‘मला या व्हिडिओत लुप दिसतोय’ तर आणखी एकाने लिहिले ‘बेबीचा जल्लोष पुन्हा एकदा’.

दरम्यान अंकिता लोखंडे सध्या विक्की जैनला डेट करत असून दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. अंकिता लोखंडे सतत सोशल मीडियावर आपले रोमॅन्टिक व्हिडिओ पोस्ट करत असते. अलीकडेच तिने बॉयफ्रेंड विक्की जैनला किस करतानाचा फोटो शेअर केला होता. याआधी जून महिन्यात केलेल्या एका पोस्ट मध्ये तिने विक्की जगातला सर्वोत्तम बॉयफ्रेंड आहे असेही सांगितले होत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा