Wednesday, July 3, 2024

सुशांतच्या मृत्यूचा धक्का आजही पचवू शकली नाही अंकिता, मुलाखतीत सांगितल्या ‘या’ गोष्टी

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग. आपल्या मालिकेसोबतच खऱ्या आयुष्यात देखील ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. पवित्र रिश्ता या मालिकेने त्यांना घराघरात पोहोचवले. इथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. ते दोघे जवळपास सहा वर्ष एकमेकांसोबत होते. परंतु नंतर काही कारणांनी त्या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतरही त्या दोघांमध्ये मैत्री कायम राहिली. आज सुशांतला या जगातून जाऊन नऊ महिने उलटले आहेत. याबद्दल अंकिताने तिच्या एका मुलाखतीत त्याच्या मृत्यूनंतरच्या घटनांचा खुलासा केला आहे.

अंकिताने सांगितले की, “सुशांतच्या मृत्युनंतर तिने सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट शेअर नव्हती केली. त्यामुळे अनेकांनी तिला टोमणे मारले होते. प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांना तिला सामोरे जावे लागले होते. याबाबत तिने पोस्ट शेअर न केल्याचे कारण देखील सांगितले होते. तिने सांगितले की, त्यावेळेस तिच्याकडे एवढी हिम्मत नव्हती की, ती सुशांतचे फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली अर्पण करेल.”

अंकिताने पुढे सांगितले की, “ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्यादिवशी मी सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती. या गोष्टीवरून सगळ्यांनी मला जज करायला सुरुवात केली होती. लोकांना नक्की अपेक्षा काय आहेत? हे समजून घेणं खरचं खूप अवघड आहे. आपल्या जवळची कोणती व्यक्ती हे जग सोडून गेल्यावर आपण काय नेहमी पोस्ट करत बसतो का?”

“मी आजपर्यंत कधी त्याचा फोटो शेअर करून त्याला आरआयपी असं नाही म्हणू शकले, कारण त्याच्या मृत्यूवर आजही माझा विश्वास बसत नाहीये. त्याला श्रद्धांजली वाहायची हिम्मत माझ्यात तेव्हाही नव्हती आणि आजही नाहीये,” असेही अंकिताने सांगितले.

https://www.facebook.com/SushantSinghRajput/photos/a.377483425777360/473535262838842/?type=3

तिने पुढे सांगितले की, “सुशांतच्या मृत्यूनंतर मी आणि माझ्या कुटुंबाने आणि सुशांतच्या कुटुंबाने खूप गोष्टी सहन केल्या आहे. सुशांतचा मृत्यू ही गोष्ट नेहमीच माझ्यासोबत राहणार आहे. मी आता कुठे या घटनेतून नॉर्मल झाली आहे. पण मला खूप काही सहन करायला लागलं होतं. मीच काय पण संपूर्ण जग त्याच्यासाठी रडत होते. कालच एक स्त्री माझ्याकडे आली होती, आणि ती सुशांतच्या मृत्युमुळे खूप रडत होती. मला असं वाटतं मी सुशांतसोबत बोलू शकते, त्याला हे सांगू शकते की, बघ सगळेजण तुझ्यासाठी रडत आहेत. सगळेजण किती प्रेम करतात तुझ्यावर.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

-हॉटेल रूममध्ये एकटीच असलेली सनी लिओनी अचानक मारू लागली बेडवर उड्या; चाहत्यांकडून व्हिडिओला मिळतंय भरभरून प्रेम

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

हे देखील वाचा