Sunday, February 23, 2025
Home अन्य अरेरे! अंकिता अन् विकीच्या लग्नावर पडली ‘ओमिक्रॉन’ची नजर, रद्द करण्यात आता रेड कार्पेट इव्हेंट

अरेरे! अंकिता अन् विकीच्या लग्नावर पडली ‘ओमिक्रॉन’ची नजर, रद्द करण्यात आता रेड कार्पेट इव्हेंट

अभिनय सृष्टीमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नुकतेच कॅटरिना कैफ आणि विकी कौशल लग्नबंधनात अडकले आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्याही लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. लग्नापूर्वीचे सर्व विधी मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. दोघांच्या प्रत्येक सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लाइक केले जात असून आता दोघेही मंगळवारी (१४ डिसेंबर) लग्नबंधनात अडकले आहेत.

मात्र, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर दोघांचा रेड कार्पेट इव्हेंट होणार होता, जिथे ते मीडिया फोटोग्राफर्सना भेटून फोटो क्लिक करणार होते. पण आता तो रद्द करण्यात आला आहे.

अभिनेत्रीच्या जवळच्या स्त्रोताकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे आणि सर्वांना सांगण्यात आले आहे की अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचा रेड कार्पेट इव्हेंट रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील वाढत्या ओमिक्रॉन प्रकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्या लग्नात केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रच उपस्थित होते.

कोण आहे विकी जैन
अंकिताचा पती विकी जैनबद्दल सांगायचे झाले तर, विकी जैन बिलासपूर, छत्तीसगड येथील एक यशस्वी बिझनेस मॅन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता आणि विकी दोघे कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून एका पार्टीत भेटले आणि २०१८ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी त्यांचे नाते लपून ठेवले असले, तरी गेल्या दोन वर्षांत ते अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना आणि कठीण काळात एकमेकांना साथ देताना दिसले.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर 

हे देखील वाचा