जेव्हा भोजपुरी गाण्यांबद्दल बोलले जाते, तेव्हा सगळ्यात आधी खेसारी लाल यादव, दिनेश लाल यादव, अक्षरा सिंग आणि पवन सिंग यांची नावे डोळ्यासमोर येतात. परंतु आता इंडस्ट्रीमध्ये काही असे नवीन चेहरे आहेत जे त्यांच्या आवाजाने सर्वत्र धमाल करत आहेत. यामधील एक जोडी म्हणजे अंकुश राजा आणि शिल्पी राज. सध्या ही जोडी भोजपुरी संगीत क्षेत्रात धमाल करताना दिसत आहे.
अंकुश आणि शिल्पी यांची भोजपुरी गाणी या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या त्यांचे एक नवीन गाणे यूट्यूबवरील सर्व रेकॉर्ड्स तोडताना दिसत आहे. ‘कुंवारे मे गंगा नहईले बानी’ हे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याची लोकप्रियता बघायला गेलं, तर या गाण्याला दोन महिन्यातच 18 कोटींपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सर्वत्र या गाण्याला मोठ्या प्रमाणत पसंती मिळत आहे. तसेच चाहते या गाण्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे.
या गाण्याला अंकुश राजा आणि शिल्पी राज यांनी त्यांच्या आवाजात गायले आहे. तसेच ‘बोस रामपुरी’ आणि ‘मनीष रोहतासी’ यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. आर्य शर्मा याने या गाण्याला संगीत दिले आहे. अंकुश राजा आणि महिमा सिंग यांच्यावर या गाण्याचे चित्रीकरण झाले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अंकुश आणि महिमाचा जोरदार डान्स बघायला मिळत आहे.
हा गाण्याचा व्हिडिओ अंकुश राजाच्या अधिकृत यूट्यूबवर रिलीझ केले आहे. अंकुश आणि महिमाची या गाण्यातील केमिस्ट्री सगळ्यांना खूपच आवडत आहे. गायकांचा दमदार आवाज आणि कलाकारांचा अभिनय यामुळे या गाण्याला प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. हे गाणे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-