सध्या टीव्हीवर सर्वात लोकप्रिय आणि सर्वात चर्चित असलेला रियॅलिटी शो ‘बिग बॉस’ हा आहे. त्याचबरोबर निर्माते देखील हा शो सुपरहिट बनवण्यात मागे हटत नाहीत. निर्मात्यांनी हा शो ‘बिग बॉस ओटीटी’ म्हणून लाँच केला आहे आणि टीव्हीच्या आधी डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह केला आहे, तर दुसरीकडे दर्शकांसाठी व्हीओओटीवर २४ तास पाहता येण्यासाठी सुविधा देखील दिली आहे.
इतकेच नव्हे, तर निर्मात्यांनी ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करण्यासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरची निवड केली आहे. करण जोहर देखील निर्मात्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. हा शो १० दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच दरम्यान ‘बिग बॉस’ शी संबंधित आणखी एका माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे लोकांची उत्सुकता पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि करण जोहरनंतर आता या शोचा भाग बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा बनणार आहे. (Another celebrity will soon be added to the show ‘Bigg Boss’)
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, यावर्षी निर्माते ‘बिग बॉस’सोबत आणखी एक मोठे काम करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सदाबहार अभिनेत्री रेखाची देखील या शोमध्येे ही एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. शोमध्ये, निर्माते रेखाला ट्री ऑफ फॉर्च्युनची जबाबदारी देणार आहेत. ज्यामध्ये रेखा ६ आठवड्यांनंतर ‘बिग बॉस १५’ मध्ये सलमान खानसमोर ‘बिग बॉस ओटीटी’ मधील निवडक स्पर्धकांची ओळख करून देईल.
जेव्हा हा शो थेट डिजिटलवरून टीव्हीवर प्रकाशित केला जाईल, तेव्हा शोचे होस्ट देखील बदलणार आहेत. म्हणजेच करण जोहरचा ‘बिग बॉस ओटीटी’ जेव्हा टीव्हीवर प्रकाशित केला जाईल, तेव्हा सलमान खानच या शोचा होस्ट असणार आहे. रेखा टीव्हीवर सलमानच्या शो ‘बिग बॉस १५’ मध्ये करणच्या स्पर्धकांची ओळख करून देणार आहे, पण अजून ही शोच्या निर्मात्यांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी
-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?