Sunday, June 2, 2024

ए आर रहमानचा मोठा सन्मान, कॅनडामधील रस्त्याला दिलं जाणार संगीतकारच नाव

प्रसिध्द संगीतकार जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार ए आर रहमान (A.R.Rahman)हे आपल्या काळामधील सर्वश्रेष्ठ संगीतकार मानल्या जात असलेल्या रहमानने आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. आजवरच्या त्यांच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना भारतीय संगीताला नवी ओळख दिल्याचे श्रेय दिले जाते. रिमेक आणि रीमिक्सच्या या ट्रेंडमध्ये रहमान अजूनही त्याचं अस्तित्व टिकवून आहे. आज त्याच्या याच कामामुळे त्याला परदेशात एक वेगळाच सन्मान देण्यात आला आहे.

नुकतंच रहमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कॅनडामधील एका शहरातील रस्त्याला त्याचं नाव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिटी ऑफ मारखमच्या महापौरांनी रहमानला हा सन्मान दिला असून नुकताच यासाठी एक सोहळा कॅनडा येथे आयोजित करण्यात आला होता. याच सोहळ्याचे काही फोटोज त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत ही बातमी दिली आहे.

याबाबत माहिती देताना एआर रहमानने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. म्युझिक डायरेक्टरने मार्कहॅमच्या महापौरांसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिले, “मार्खम सिटी, फ्रँक स्कारपिटी आणि कॅनडाच्या लोकांकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल कृतज्ञ.

याआधी सुद्धा २०१३ मध्ये कॅनडाच्या एका रस्त्याला रहमानचं नाव देण्यात आलं होतं. आता पुन्हा २०२२ मध्ये एका वेगळ्या रस्त्याला पुन्हा रहमानचं नाव दिलं आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. रहमानने याबद्दल तिथल्या अधिकाऱ्यांचे आणि इतर लोकांचे आभार त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मानले आहेत. शिवाय हा सन्मान देऊन माझ्यावरची जवाबदारी आणखीन वाढली असल्याचंही रहमानने नमूद केलं आहे.

रहमानने आजवर कित्येक चित्रपटांना संगीत दिलं आहे. त्यापैकी ‘रोजा’, ‘बॉम्बे’, ‘दिल से’ पासून अलीकडे आलेल्या ‘रंग दे बसंती’, ‘रॉकस्टार’, ‘हायवे’ अशा चित्रपटांचा समावेश आहे.२००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलियोनेर ह्या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमान यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या गाण्याचे शब्द गुलजार यांनी लिहिले आहेत आणि सुखविंदर सिंग यांनी ते गाणं गायलं आहे. मणीरत्नम यांच्या आगामी ‘PS 1’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा रहमान यांच्या खांद्यावर आहे. रहमान यांना आजवर दोन ऑस्कर पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ फिल्मफेअर पुरस्कार व १३ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
भारताच्या विजयानंतर संतोष जुवेकरचा राडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
राष्ट्रीय क्रीडा दिन | ‘या’ खेळाडूंच्या बायोपिकने प्रेक्षकांना लावले होते वेड
अमेरिकेतील चाहत्याने घरात लावला बिग बींचा पुतळा, किंमत ऐकून व्हाल थक्क

हे देखील वाचा