Monday, July 1, 2024

खरंच की काय! नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकने मारली होती स्वतःला चापट! म्हणाला, ‘तुझा आवाज ऐकून मला…’

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या ‘इंडियन आयडल 12’ मध्ये जज म्हणून कार्यरत आहे. नेहा कक्कर आज ज्या शोची जज आहे, एकेकाळी इथूनच तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिने स्पर्धक म्हणून शोच्या दुसर्‍या सीझनमध्ये भाग घेतला होता, परंतु शोमध्ये ती फार काळ टिकू शकली नाही. 2012 मध्ये आलेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटाच्या ‘सेकंड हँड जवानी’ या गाण्यामुळे नेहाला जबरदस्त ओळख मिळाली.

नेहा कक्करच्या या गाण्याला संगीत रसिकांनी खूप प्रेम दिले. दरम्यान, ‘इंडियन आयडल सीझन 2’ च्या ऑडिशनमधील नेहाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नेहा कक्कर ‘ऐसा लगता है’ हे रोमँटिक गाणे गाताना दिसली. त्यावेळी शोमध्ये सोनू निगम, फराह खान आणि अनु मलिक जज होते. नेहाचा परफॉर्मेन्स पाहिल्यानंतर, अनु मलिक तिच्यावर खूप नाराज झाला.

 

नेहा कक्करला मध्येच थांबवत अनु मलिकने तिला फटकारण्यास सुरुवात केली आणि म्हणाला, “नेहा कक्कर, तुझा आवाज ऐकून मला स्वतःलाच चापट मारून घ्यावीशी वाटत आहे. यार काय झालंय तुझ्या आवाजाला?” अनु मलिक केवळ हे म्हणतच नाही, तर तो स्वत: ला चापटही मारतो. हे पाहून नेहा खूपच निराश होते आणि त्याच नजरेने शोच्या जजकडे पाहू लागते.”

नेहा कक्करकडे आता पाहिले गेले, तर ती एक यशस्वी गायिका बनली आहे. ज्या शोमध्ये तिने ऑडिशन दिले होते, त्याच शोमध्ये ती आता ऑडिशन घेताना दिसते. यावरून तिने स्वतःला सिद्ध केले, असे दिसून येते. एवढेच नव्हे, तर नेहा अशी एकमेव गायिका आहे, जिला सोशल मीडियावर सर्वाधिक लोक फॉलो करतात. नुकतेच आलेले तिचे ‘मरजानिया’ हे गाणे खूप हिट झाले, ज्यामध्ये रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लाची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. आता नेहा तिचा पती रोहनप्रीतसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

हे देखील वाचा