Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड ‘या’मुळे रस्त्यावर चालताना अनु मलिकपासून लांब अंतर ठेवायची पत्नी; जाणून घ्या ‘तो’ किस्सा

‘या’मुळे रस्त्यावर चालताना अनु मलिकपासून लांब अंतर ठेवायची पत्नी; जाणून घ्या ‘तो’ किस्सा

गायक अनु मलिक (Anu Malik) आपल्या बहारदार आवाजाने नेहमीच चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. मात्र आपल्या गाण्यांपेक्षा ते त्यांच्या मजेशीर किस्से आणि शायरी ऐकवूनच चाहत्यांना आकर्षित करत असतात.

अलिकडेच झी टीव्हीवरील ‘सारेगमप’ या शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून संगीतकार अनु मलिक यांनी उपस्थिती दर्शवली होती. दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या या शोमध्ये अनु मलिक यांच्या सहभागाने आणखीच रंगत वाढलेली पाहायला मिळाली. यावेळी अनु मलिक यांनी सहभागी स्पर्धकांना खुप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल सोबतच त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. मात्र त्यांना सगळ्यात जास्त आकर्षित केलं ते म्हणजे, स्पर्धक अनन्याच्या हेअर स्टाइलने. याच विषयावर बोलताना अनु मलिक यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला किस्सा सांगितला, जो ऐकून सगळे पोटभरून हसू लागले.

आपले गाणे सादर करण्यासाठी जेव्हा अनन्या मंचावर आली तेव्हा तिच्या केसांच्या स्टाइलने अनु मलिक खूपच आकर्षित झालेले पाहायला मिळाले. इतकेच नव्हे, तर त्यांनी ‘मला पुन्हा 90च्या दशकात गेल्यासारखं वाटतंय’, अशी खास प्रतिक्रिया सुद्धा यावेळी दिली. सोबतच त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक मजेशीर किस्सा ऐकवला.

यावेळी अनु मलिक यांनी सांगितले की, “मला आजही आठवतंय, जेव्हा मी माझ्या पत्नीसोबत बाहेर जेवायला निघालो होतो. त्यावेळी मी तिला सांगितले होते की मी माझ्या शेंडी सोबत काऊबॉय टोपी आणि लेदरचे बूट घालणार आहे. त्यावेळी मी सुद्धा अशाच प्रकारची हेअर स्टाईल ठेवत होतो आणि त्यावर टोपी घालत होतो. मात्र ज्यावेळी मी प्रत्यक्षात बायको सोबत जेवायला निघालो. त्यावेळी तिने निश्चित केले की ती माझ्यापासून लांब अंतर ठेवून चालेल आणि ती मला ओळखत नसल्याचा दिखावा करेल.”

अनु मलिक यांनी सांगितलेल्या या मजेशीर गोष्टीवर सगळेच हसायला लागले. मात्र, ‘मला माझी ही स्टाईल खूप आवडायची’ असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा :
शाहरुख खानच्या आधी ‘या’सुपरस्टारला ‘डर’ चित्रपटात ‘राहुल मेहरा’ची भूमिका केली होती ऑफर
आज 6000 कोटींचा मालक असणाऱ्या शाहरुख खानच्या कुटुंबाला एकेकाळी दोन वेळची भाकरी मिळणे होते कठीण!

हे देखील वाचा