Friday, July 5, 2024

पहिल्यांदा शोमध्ये इंटिमेट होणार अनुज आणि अनुपमा, मालिकेत दिसणार दोघांमध्ये किसिंग सीन

चित्रपटात बोल्ड सीन इंटिमेट सीन असणे हे आजच्या काळात खूपच सामान्य बाब आहे. मात्र जेव्हा असे सीन टीव्ही मालिकांमध्ये पाहायला मिळतात तेव्हा? असे सीन मालिकांमध्ये खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र जेव्हा असे सीन येतात तेव्हा ते तुफान गाजतात. अनेक दिवस त्या सीनवर चर्चा होत असते. मालिकांमध्ये असे सीन शूट करणे खूपच जबाबदारीचे काम आहे. आता असेच इंटिमेट सीन लवकरच अमाप गाजणाऱ्या ‘अनुपमा’ या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. अनुपमा आणि अनुजमध्ये दुराव्यानंतर आता रोमान्स पाहायला मिळणार आहे. या सीनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनुपमा या मालिकेत मागील बऱ्याच काळापासून शाह कुटुंबामुळे अनुपमा आणि अनुजमध्ये अंतर निर्माण झाले होते. मात्र आता अनुपमा त्यांच्यामध्ये आलेला दुरावा मिटविण्याचे ठरवते आणि त्याच्यासाठी एक रोमॅंटिक सरप्राइज प्लॅन करते. मालिकेत पुढे तिच्या आणि अनुजच्या नात्याला ती पुन्हा एकदा नव्याने सुरु करण्याचा तिचा प्रयत्न दाखवला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून रोमॅंटिक सीन शूट केले गेले. दोघांमध्ये किसिंग सीन देखील पाहायला मिळणार आहे. मालिकेचे प्रेक्षक देखील त्यांच्यात निर्माण होणारे प्रेमळ सीन पाहून खूप खुश झाले आहेत. त्या दोघांमध्ये असणारे प्रेम पाहून फॅन्स सोशल मीडियावर तुफान पोस्ट आणि कमेंट्स करताना दिसत आहे. याच निमित्ताने ट्विटरवर सध्या हा शो ट्रेंडिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे.

अनुपमा शो हा सुरु झाला तसा टीआरपीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. शोमध्ये येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे. शोमध्ये अनुपमा ही भूमिका रुपाली गांगुली निभावत असून, अनुजची भूमिका गौरव खन्ना निभावत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे! फराह खान होती करण जोहरच्या प्रेमात, तांत्रिक अडचण सांगत ‘त्याने’ नाकारला प्रस्ताव

पतीच्या ‘या’ गोष्टीला कंटाळलेली फराह खान लग्नाच्या एका वर्षातच जाणार होती पळून, वाचा रंजक किस्सा

हे देखील वाचा