Tuesday, April 8, 2025
Home मराठी खरंच की काय! अनुजा साठे- अभिज्ञा भावे यांना आल्यात मिशा; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

खरंच की काय! अनुजा साठे- अभिज्ञा भावे यांना आल्यात मिशा; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

अनेक कलाकार असे असतात जे काम करता करता एकमेकांच्या इतके जवळ येतात की, त्यांच्यामध्ये एक अतूट मैत्रीचे नाते तयार होते. एकत्र, हसणे, रागावणे पुन्हा गोड होणे या त्यांच्या नात्यातील अत्यंत गोड गोष्टी असतात. अशीच एक मैत्रिणींची जोडी म्हणजे अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे. या दोघीही अत्यंत जिवाभावाच्या मैत्रिणी आहे. त्यांच्या मैत्रीमधील प्रेम आणि वेडेपणा आपण नेहमीच सोशल मीडियावर पाहिला आहे. त्यांचे नेहमीच मस्ती करताना फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच त्यांचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे.

अनुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि अभिज्ञाचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघीही एका मजेशीर हिंदी डायलॉगवर अभिनय करत आहे. त्या दोघींनीही दाढी
आणि मिशा असलेला फिल्टर वापरला आहे. अत्यंत मजेशीर अंदाजात त्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “हे असं फक्त अभिज्ञासोबत असतानाच होऊ शकतं. आय लव्ह यू क्रेझी गर्ल. हा व्हिडिओ बनवताना आम्ही खूप हसलो आहोत.” त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तसेच अनेक कलाकार देखील या व्हिडिओवर कमेंट करत

अनुजा आणि अभिज्ञा या दोघींनी ‘लगोरी’ या मालिकेत एकत्र काम केले आहे. ही मालिका देखील मैत्रीवर आधारित होती. यामध्ये त्या अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी दाखवल्या होत्या. अभिज्ञाने पुढे अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, ‘देवयानी एक्का राजा राणी’ यासारख्या मालिकेत काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेची शूटिंग करत आहे. अनुजाने ‘तमन्ना’, ‘पेशवा बाजीराव’, ‘एक थी बेगम’, ‘राखणदार’, ‘मी पण सचिन’, ‘घंटा’, ‘ब्लॅकमेल’ यांसारख्या मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा