Saturday, June 29, 2024

पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद

बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे करोडो फॅन फॉलोविंग आहेत. ते सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतात. त्यांनी नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अनुपम यांना विचारले की, ‘माझी किरण कशी आहे?’ त्या व्हिडिओत अनुपम हे त्यांच्या आईसोबत बोलताना दिसत आहे. अनुपम यांची आई चाहत्यांना विचारत आहे की, तुम्ही सर्वजण ठीक आहात का? मी ठिक आहे. अनुपम यांनी त्यांच्या आईसाठी एक पर्स खरेदी केली. अनुपम म्हणतात की, “जगभरात तुझे फॅन खूप आहेत. ते ही तुझ्याविषयी विचारत असतात.”

अनुपम यांच्याकडे खूप पैसे दिसत नाही. ते आईला म्हणतात की, माझ्याकडे फक्त १००० रुपये आहेत. यावर त्यांची आई म्हणते पैसे पर्समध्ये ठेव. यावर पुढे बोलताना ते आईला सांगतात की, मी अमेरिकेत कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेव्हा तेथील अनेक चाहत्यांनी मला तुझ्या प्रकृतीविषयी माहिती विचारली. अनुपम आणि त्यांच्या आईच्या या व्हिडिओला चाहते खूप पसंती दर्शवत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना अनुपम यांनी लिहिले की, “आई पर्स घेऊन माॅडेलसारखी चालत आहे. आई फक्त ५०० रुपये पर्समध्ये ठेवून खुश नव्हती. मी आईसाठी अमेरिकेतून एक पर्स मागवली आणि ती आईला खूप आवडली.” तसेच अनुपम यांनी आईला पर्स घेऊन माॅडलसारखे चालायला सांगितले. अनुपम यांची आई म्हणते की,“ चाहते मला मास्क घातल तरीही ओळखतात. हेच माझ्यासाठी खूप आहे.”

अनुपम यांच्या या व्हिडिओला चार लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की,“आई ही आईच असते.” तर दुसर्‍या यूजरने लिहिले की,“आईचे प्रेम कायम राहते.” तसेच अनुपम हे बर्‍यापैकी सोशल मीडियावरुन चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतात.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक

बॉलिवूडमधील ‘या’ चित्रपटांमध्ये जेठालाल यांनी साकारल्या होत्या लहान-मोठ्या भूमिका, आज आहे टेलिव्हिजनवरील सुपरस्टार

‘या’ सुपरहिट चित्रपटांसाठी ‘या अभिनेत्री होत्या पहिली पसंती, कोणी प्रेग्नन्सीमुळे तर कोणी ब्रेकअपमुळे सोडले सिनेमे

 

हे देखील वाचा