Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड क्या बात है! वयाच्या ६७व्या वर्षी अनुपम खेर यांनी केली ५२६व्या सिनेमाची घोषणा, वाचा सविस्तर

क्या बात है! वयाच्या ६७व्या वर्षी अनुपम खेर यांनी केली ५२६व्या सिनेमाची घोषणा, वाचा सविस्तर

बॉलीवुडचे प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांनी भारतीय सिनेमात आपल्या 38 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत अनेक ताकदीचे चित्रपट केले आहेत. ‘अ वेन्सडे’ ते ‘स्पेशल 26’ सारख्या अनेक कल्ट चित्रपटांचीही नावं इथे घेता येतील. तब्बल 525 चित्रपटांमध्ये काम केल्यावर खेर यांनी आता जुने मित्र आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्यासह आगामी सिनेमा ‘कागज 2’ ची घोषणा केली आहे. नाटकांमधून आपली सुरवात करत चित्रपटांमध्ये ठळक मुद्रा उमटवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कमालीचा खास आहे.

‘कागज 2’ हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कागज’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी मुख्य भूमिका केली होती. हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या संघर्षावर प्रकाश टाकत होता. माणसाला शासनाने जिवंत असतानाच चुकून मृत घोषित केलेले असते.

स्वदेशी सोशल मीडिया मंच कू वर आपल्या नव्या प्रकलपाबाबतचा व्हिडिओ पोस्ट करत अनुपम खेर यांनी लिहिले, “मित्रांनो, या 28 वर्षांमध्ये 526 चित्रपट! केवळ तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद यांमुळेच हे शक्य झाले आहे. आज मी जो काही आहे, तो तुमचे प्रेम, प्रार्थना आणि प्रेमामुळेच आहे.” व्हिडिओच्या शेवटी अनुपम म्हणतात, “चला, आयुष्याचा उत्सव साजरा करू या, सिनेमाचा उत्सव साजरा करू या.” अनुपम खेर यांच्यासह या सिनेमात पंकज त्रिपाठी, मोनल गज्जर, सतीश कौशिक आणि अमर उपाध्याय यांच्याही खास भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक व्हीके प्रकाश आहेत.

अनुपम खेर आणि सतीश कौशिक हे 1975 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र होते. तेव्हापासूनच त्यांच्यात मैत्री आहे. दोघांनी शेवटचे एकत्र काम ‘द कश्मीर फाइल्स’ मध्ये केले होते. काही काळापूर्वीच प्रदर्शित झालेला हा चित्रपट विवेक अग्निहोत्रीने दिग्दर्शित केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा