Monday, July 1, 2024

सुखद धक्का! अभिनेते अनुपम खेर यांचे अभिनयासोबतच ‘या’ क्षेत्रात पदार्पण, पोस्ट शेअर दिली माहिती

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना त्यांच्या प्रतिभावान आणि सजीव अभिनयासाठी ओळखले जाते. सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी लीलया करणाऱ्या अनुपम यांच्या अभिनयामधील सहजतेबद्दल कोणाचेच दुमत नसेल. लहान, मोठी कोणतीही भूमिका त्यांनी सहजरित्या पेलत वाहवाई मिळवली आहे. आज अनुपम खेर हे अभिनयासाठी ओळखले जात असले तरी त्यांची अभिनय करण्यासोबतच अजून एका क्षेत्रामध्ये एकतरी संधी मिळवली अशी इच्छा होती. सुदैवाने त्यांना मनोरंजनविश्वात एवढे वर्ष घालवल्यानंतर ती खास संधी त्यांना मिळाली आहे. याबद्दल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.

अनुपम खेर हे लवकरच एक गायक म्हणून आपल्या सर्वांसमोर येणार आहे. याचा खुलासा त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. अनुराग बसू यांच्या आगामी ‘मेट्रो इन दिनो’साठी त्यांनी नुकतेच एक गाणे रेकॉर्ड केले आहे. या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांनी संगीत दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, “सगळीच स्वप्न खरंच पूर्ण होतात. मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की, मला प्रीतम संगीत देत असलेल्या अनुराग बसू यांच्या ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटासाठी गाणे गायची संधी मिळेल. मात्र मीच सांगतो काहीही होऊ शकते. मेरी तो निकल पडी. प्रीतम आणि अनुराग हे त्यांच्या क्षेत्रात जिनियस आहे. त्यांच्यासाठी गाणे गायला मिळणे गर्वाची बाब आहे.

या कॅप्शनसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, “प्रीतम दा यांच्यासाठी गाणे माझे स्वप्न होते. मला वाटते की, प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या अधिक जवळ नेतो. लोकांना हे आवडेल किंवा नाही माहित नाही, मात्र मी माझा नक्कीच प्रयत्न केला आहे.” दरम्यान अनुराग बसू यांचा सिनेमा एक एंथोलॉजी आहे. यात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खेर, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहिल्या पत्नीला घटस्फाेट दिल्यानंतर बादशाह पुन्हा अडकणार लग्न बंधनात, ‘या’ महिण्यात घेणार सातफेरे

ऑस्कर विजेता राम चरणच्या पत्नीचा दुबईत पार पडला बेबी शॉवर साेहळा, फोटोंमध्ये दिसली सेलिब्रेशनची झलक

हे देखील वाचा