Saturday, March 7, 2026
Home बॉलीवूड या अभिनेत्याने 500 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम, तर 71 व्या वर्षीही दिसतात फिट्ट

या अभिनेत्याने 500 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम, तर 71 व्या वर्षीही दिसतात फिट्ट

अनुपम खेर बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेते आहेत तर त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटे दिली. तर त्यांचा आज वाढदिवस आहे. यांचा जन्म 7 मार्च 1955 रोजी झाला. हा त्यांचा एकत्र 71 व्हा वाढदिवस आहे. त्यांच्या या संपूर्ण जीवन प्रवासात त्यांनी 540 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. अनुपम खेर यांनी 1982 चित्रपटांमध्ये पदार्पणान केले. महेश भट्ट दिग्दर्शित त्यांच्या पहिल्या चित्रपटात त्यांनी एका 65 वर्षीय वडीलांची भूमिका साकारली होती, पण ते त्यावेळेस फक्त 28 वर्षाचे होते. अशा अनेक वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि आजही ते साकारत असतात

एका शो दरम्यान अनुपम खेर यांनी त्यांच्या कारकिर्दीतील यश, संघर्षांबद्दल उघडपणे सांगितले. या काळात अनुपम खेर यांनी तरुणपणीच त्यांना म्हाताय्रा लोकांची भूमिका का साकारावी लागली हे उघड केले. जेव्हा त्यांना विचारले गेले की ते बहुतेकदा त्यांच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे वडील का असतात, तेव्हा ते म्हणाले, “माझे तारुण्य कोणीही पाहिले नाही. जर महेश भट्ट यांनी 28 वर्षांच्या व्यक्तीला 65 वर्षांच्या वृद्धाची भूमिका दिली नसती, तर मी इथे असलो नसतो. माझ्या यशात याचा मोठा वाटा होता. मला हा चित्रपट मिळाला, तर मी कसा नकार देऊ शकेन? मग यश चोप्रांनी मला विजयमध्ये हेमा मालिनीच्या वडिलांची भूमिका ऑफर केली. मी राजेश खन्नाच्या सासऱ्याची भूमिका केली आणि मी ऋषी कपूरच्या वडिलांची भूमिका केली, जे माझ्यापेक्षा मोठे होते. यापैकी काहीही माझ्यासाठी महत्त्वाचे नव्हते कारण काम हे काम आहे.

अनुपम खेर (Kher)इंडस्ट्रीमध्ये आज लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. ते नेहमीच नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देतात. इतकेच नाही तर ते त्यांच्या फिटनेससाठी सतत बातम्यांमध्ये असतात. 71 व्या वर्षीही अनुपम खेर त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या फिटनेस आणि समर्पणाने प्रेरित देत असतात. ते नियमितपणे त्यांचे वर्कआउट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करतात. त्याच्या फिटनेसकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की ते 71 वर्षांचे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

बादशाह त्याच्या नवीन तिहारी गाण्याने अडकला अडचणीत, हरियाणा महिला आयोगाने बजावले समन्स

हे देखील वाचा