Saturday, July 6, 2024

‘श्रीवल्ली’ गाण्यावरील आतापर्यंतचा बेस्ट व्हिडिओ, अनुपम खेर यांच्या आईने केला गाण्यावर भन्नाट डान्स

आतापर्यंत आपण अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) सिनेमातील ‘श्रीवल्ली’ (Srivalli) गाण्यावर अनेक व्हिडिओ, रिल्स पाहिले असतील. या सिनेमाने यातील गाण्यांनी, डान्सने लोकांना अक्षरशः वेड लावले आहे. सोशल मीडिया चालू केले लगेच याच सिनेमातील गाणी, व्हिडिओ आणि रिल्स समोर यायला सुरुवात होते. कलाकार काय आणि सामान्य लोकं काय सर्वच या गाण्यांवर त्यांचे रिल्स बनवत आहे, मात्र आज आम्ही तुम्हाला या गाण्यावरील आतापर्यंतचे सर्वात सुंदर आणि गाजणारे रील दाखवणार आहोत.

नुकताच दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आईचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची आई ‘श्रीवल्ली’ गाण्यावर अफलातून डान्स करत गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. अनुपम खेर यांची आई दुलारी या सोशल मीडियावर तुफान गाजत असतात. त्यांचे मजेशीर व्हिडिओ नेहमीच अनुपम खेर सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. दुलारी यांचे सर्वच व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत त्यांना अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून देतात. आता अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये दुलारी यांनी अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर ठेका धरला असून, घरातच त्यावर डान्स केला आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दुलारी यांनी मस्त डान्स केला असून, हा डान्स नेटकऱ्यांना खूपच आवडत असून, तशा कमेंट्स देखील या व्हिडिओवर येत आहेत.

अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “हे एपिक आहे. धन्यवाद वृंदा खेर आईचा हा व्हिडिओ शूट केल्याबद्दल.” यासोबतच त्यांनी #DulariRocks #Pushpa हा हॅशटॅग देखील वापरला आहे. यवयतही दुलारी यांची एनर्जी आणि त्यांचे स्पिरिट पाहून लोकांना आश्चर्य सुद्धा वाटत आहे. दुलारी यांचे रागवणारे, प्रेमळ, डान्सचे आदी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनुपम शेअर करतात. हे सर्वच व्हिडिओ खूपच हिट होतात. दुलारी यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये नरेंद मोदी यांची स्तुती करत पुढचे पंतप्रधान देखील मोदीच होणार असे सांगितले होते.

अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा’ सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अल्लू अर्जुनचे कौतुक करत त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.

हेही वाचा –

हेही पाहा- 

हे देखील वाचा