Monday, July 1, 2024

दुलारी खेर यांनी केले पीएम मोदी यांच्या पदवीवर भाष्य, नेटकरी म्हणाले ‘केजरीवालांना उत्तर मिळाले’

मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावरून आणि पदवीवरून लोकांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये वाद सुरु आहे. हा वाद कमी न होता सतत वाढत आहे. नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी तर पंतप्रधानांकडे थेट त्यांच्या पदवीचीच मागणी केली आहे. या सर्व गोष्टींवर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या आई असणाऱ्या दुलारी खेर यांनी त्यांचे मत मांडले आहे.

काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी पीएम मोदी यांनी त्यांची पदवी सार्वजनिक करावी याची मागणी केली होती. केजरीवाल यांच्या या मागणीला गुजरात कोर्टाने तुच्छ म्हणत त्यांच्यावर २५ हजार रुपयांचा दंड बसवला. तर दुसरीकडे आयाम आदमी पसखाने पुन्हा त्यांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, पीएम स्वतःला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. कारण जर त्यांच्याकडे असलेल्या पदवीची तपासणी झाली तर ती खोटी निघेल.

यावर अनुपम खेर यांची आई असलेल्या दुलारी यांनी म्हटले आहे की, “तर तुम्ही शिकवा त्यांना. ते तुमच्यासारख्या दहा लोकांना शिकवतील. ते इतके काम करत आहे. अनेक लोकांसोबत उठत बसत आहे, आणि तुम्ही बोलतात ते शिकलेले नाही. शिकण्यात काय आहे? डोक असावे लागते. डोकं सर्वात जास्त आवश्यक आहे. शिकलेल्या लोकांमध्ये कुठे असते डोकं?”

अनुपम खेर यांनी हा मजेदार व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. ते व्हिडिओमध्ये त्यांच्या आईला देशात चालू असणाऱ्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारतात. आपल्या मुलाने विचारलेल्या प्रश्नावर दुलारी यांनी त्यांच्या अंदाजमध्ये उत्तरं दिली आहेत. नेटकऱ्यांना दुलारी यांचा हा अंदाज खूपच आवडत आहे. अनेकांनी कमेंट्स करत त्यांना व्हिडिओ आवडल्याचे लिहिले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?

हे देखील वाचा