Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘माझ्या मनात तुमच्या दोघांसाठी…’, म्हणत अनुपम खेर यांनी शेअर केला सुपरस्टार नागार्जुन आणि त्यांची पत्नी अमलासोबतचा फोटो

‘माझ्या मनात तुमच्या दोघांसाठी…’, म्हणत अनुपम खेर यांनी शेअर केला सुपरस्टार नागार्जुन आणि त्यांची पत्नी अमलासोबतचा फोटो

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आताच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी त्यांची पत्नी किरण खेर यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याची बातमी सांगितली आहे. त्यांच्या तब्येतीबाबत खुलासा करताना किरण खेर यांची तब्येत ठीक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याआधी अनुपम खेर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन आणि त्यांची पत्नी अमला हिच्यासोबत एक फोटो शेअर केला होता.

या फोटोसोबत अनुपम यांनी भावुक पोस्ट लिहिली होती की, “ही सुंदर सायंकाळ आणि स्वादिष्ट जेवणासाठी धन्यवाद. माझ्या मनात तुमच्या दोघांसाठी देखील खूप प्रेम आहे. आज मला आपल्या त्या जुन्या दिवसांची आठवण येत आहे, जेव्हा आपण एकत्र काम करायचो आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करायचो. सोबत मला हे सांगावेसे वाटत आहे की, तुमच्या ‘वाइल्ड डॉग’ या चित्रपटाचा ट्रेलर मला खूपच आवडला आहे. तुमच्या या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा.”

नागार्जुनचा थ्रिलर चित्रपट ‘वाइल्ड डॉग’ हा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी संपूर्ण टीम आणि प्रेक्षक देखील खूप उत्सुक आहेत.

तिथेच अनुपम खेर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, ते सोशल मीडियावर प्रत्येक मुद्यावर ते मोकळेपणाने त्यांचे मत मांडत असतात. मागील काही दिवसांपासून ते फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्यांच्या अनेक गोष्टी सांगत असतात. त्यांचा टक्कल पडलेल्यांसाठी एक व्हिडिओ मागे खूपच व्हायरल झाला होता. सोबतच त्यांनी एक कविता पोस्ट करून मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांचे दुःख दाखवले होते. त्यांच्या या व्हिडिओला देखील खूप पसंती मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिशन मंगल’ फेम कीर्ती कुल्हारीची मोठी घोषणा; पती साहिल सेहगलपासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय

-‘सिंड्रेला’ बनत अभिनेत्री निया शर्माची साराला टक्कर; फोटो पाहून नेटकरी म्हणाले ‘जो नियासे जले…’

-किम कर्दाश‍ियानची हॉटनेस पुन्हा एकदा चर्चेत! स्किन कलरच्या बिकिनी फोटोने केला सोशल मीडियावर राडा

हे देखील वाचा