Wednesday, June 26, 2024

अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा

अक्षय कुमारच्या अभिनयाच्या प्रतिभेबाबत कोणालाच शंका नाही. तो एक उत्तम आणि प्रगल्भ अभिनेता आहे. आजवर अक्षयचे सर्वच सिनेमे तुफान गाजले. काहीतरी वेगळे आणि पठडीबाहेरील सिनेमे करण्यामध्ये नेहमीच त्याचा हातखंडा राहिला. मात्र २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी काही खास ठरले नाही. यावर्षात त्याचे प्रदर्शित होणारे सर्वच सिनेमे फ्लॉप ठरले. अक्षयचा असाच एक जुना सिनेमा म्हणजे ‘स्पेशल 26’. या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली आणि बक्कळ गल्ला देखील कमावला. जरा वेगळा आणि सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या या सिनेमाला लोकांनी देखील पसंतीची पोचपावती दिली. नुकतेच या सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने या साणमातील अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटर अकाउंटवर याबाबत ट्विट करत या सिनेमाच्या सिक्वलची मागणी केली.

अक्षय कुमार, अनुपम खेर यांच्या ‘स्पेशल 26’ या सिनेमाला प्रदर्शित होऊन १० पेक्षा अधिक वर्ष झाले आहेत. या सिनेमात अक्षय, अनुओं खेर यांच्यासोबत मनोज बाजपेयी देखील महत्वाच्या भूमिकेत होते. नीरज पांडे दिग्दर्शित हा सिनेमा १९८७ साली घडलेल्या ओपेरा कांडवर आधारित होता. आता अनुपम खेर यांनी ट्विट करत सिनेमाच्या सिक्वलची मागणी केली आणि हे ट्विट अक्षय कुमारला देखील टॅग केले.

अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “आज आपल्या ‘स्पेशल 26’ सिनेमाला प्रदर्शित होऊन १० वर्ष झाले. मी आपल्या हुशार आणि प्रतिभावान दिग्दर्शक असलेल्या नीरज पांडे यांना अनेकदा सांगितले की, आपण या सिनेमाचा दुसरा भाग बनवला पाहिजे. आता तुम्हीच सांगा या सिनेमाचा दुसरा भाग आला पाहिजे की नाही?”

या ट्विटला उत्तर देताना अक्षय कुमारने लिहिले, “मी तर तयार आहे. जर उत्तम स्क्रिप्ट असेल तर मी तयार आहे. खरी ताकद स्क्रिप्टमध्येच असते.” यासोबत त्याने सिनेमातील एक संवाद देखील ट्विट केला. “असली पावर दिल में होती है” तत्पूर्वी अक्षय कुमारच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच इम्रान हाश्मीसोबत ‘सेल्फी’ सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमात येत्या २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम स्मृती इराणी यांचा हाेणारा जावई आहे तरी कोण? जाणून घ्या…

सिद्धार्थ, कियारा यांना शुभेच्छा देताना बॉलिवूडवर पुन्हा एकदा कंगनाने साधला निशाणा

हे देखील वाचा