Monday, July 1, 2024

‘कोणामध्ये देखील एवढी ताकद नाही…’ अनुपम खेर यांनी ‘पठाण’बद्दल केले व्यक्तव्य

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शित झाला, आणि त्याने इतिहास रचला. बॉलिवूडच्या इतिहासात सर्वात जास्त हिट होणार सिनेमा म्हणून पठाण आता ओळखला जाणार आहे. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाने सिद्ध केले की, प्रेक्षकांना अपेक्षित असा सिनेमा तयार केला आणि तो योग्य वेळी सिनेमानगृहात उतरवला की यश हे मिळणारच. शाहरुख खानला तब्बल चार वर्षांनी यशाची चव या सिनेमाच्या निमित्ताने चाखायला मिळाली आहे.

Anupam-Kher

सिनेमा आज ब्लॉकबस्टर ठरला असला तरी या चित्रपटाला प्रदर्शनाआधी ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा सामना करावा लागला होता. मधल्या काही काळापासून सतत सोशल मीडियावर चित्रपटांविरोधात, कलाकारांविरोधात बॉयकॉट हा ट्रेंड सुरु झाला आहे. यामुळे अनेकदा चित्रपटांना किंवा कलाकारांना त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. या बॉयकॉट ट्रेंडवर अनेक लोकांनी भरभरून सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियासमोर येऊन त्यांची मतं व्यक्त केली. यातच आता दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते असलेल्या अनुपम खेर यांनी देखील यावर भाष्य केले आहे.

pathan movie

यावर अनुपम खेर यांनी सांगितले की, “कोणताही ट्रेंड हा प्रेक्षकांना चित्रपट न बघण्यासाठी प्रेरित करू शकत नाही. जर लोकांना सिनेमाचा ट्रेलर आवडला तर ते चित्रपटगृहांमध्ये जाऊन दर सिनेमा बघणारच यात शंका नाही. जर सिनेमा चांगला असेल तर कोणामध्ये देखील एवढी ताकद नाही की तो चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर सादर होऊ शकेल. लोकं बहिष्कार टाकण्याच्या विरोधात जाऊन सिनेमा बघतील.” पुढे ते म्हणाले, “प्रेक्षकांनी कधीच चित्रपटांचा बहिष्कार केला नाही. आपण मोठ्या रोगातून गेलो आहोत, लॉकडाऊन होते आणि लोकं घरात बसले होते. हे सर्व १०० वर्षांनी किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांनी झाले आहे. यातच प्रेक्षकांनी मनोरंजनाची इतर साधने शोधली. यातच ओटीटीला सुगीचे दिवस आले आणि त्यांनी यावर चित्रपट पाहण्यास सुरुवात केली.”

तत्पूर्वी अनुपम खेर हे लवकरच त्यांच्या आगामी ‘शिव शास्त्री बलबोआ’ सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात नीना गुप्ता, नरगिस फाखरी, शारिब हाशमी आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत असतील. हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे पठाण सिनेमाने आतापर्यंत संपूर्ण जगात ८०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली असून, त्याची घोडदौड अजूनही चालू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐकावं ते नवल! कोलकात्यात चाहत्यांनी बनवलंय ‘बच्चन धाम’ मंदिर, दररोज होते बिग बींची पूजा
निमृत कौर फिनालेच्या काही दिवस आधी बिग बॉसमधून बाहेर, मंडळींमधील अजून एक सदस्य कमी

हे देखील वाचा