बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी ते नेहमीच त्यांचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनुपम यांना लहान मुले खूप आवडतात. ते नेहमीच लहान मुलांचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी रस्त्यावर गाणे गात असणाऱ्या लहान मुलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुलांचे हे गाणे अनुपम यांना खूप आवडले होते. हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना देखील खूप आवडला आहे.
अनुपम यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तीन मुले दिसत आहेत. ही मुले रस्त्यावर उभी राहून गात आहेत. रस्त्यामध्ये उभा असलेला एक मुलगा हातात काठी घेऊन गिटारसारखे वाजवत आहे. त्याच्या आजूबाजूला असलेली मुले डान्स करत गाण्यामध्ये दंग आहेत.
ही मुले त्यांच्या मस्तीमध्ये दंग होऊन गाणी गात आहेत. यांना बघून कोणताही माणूस त्यांची सगळी दुःख विसरून हसल्याशिवाय राहणार नाही.
या मुलांचा व्हिडिओ शेअर करून अनुपम यांनी लिहिले आहे की, “सगळ्यात बेस्ट म्युझिकल बॅंड. मला त्यांना जग फिरवायचे आहे. मला असं वाटतं की, ही मुले नेहमी अस्पष्ट शब्द उच्चारूनही एक आशा घेऊन गात असतात. मला असे वाटते की, यांचे बोल देखील त्याप्रकारे आहेत ज्याप्रकारे आता संपूर्ण जग अवघड परिस्थितीतून जात आहे. या गाण्याचा आनंद घ्या. हे सगळ्यात बेस्ट गाणे आहे. मी त्यांना ग्रॅमी अवॉर्ड घोषित करत आहे. आणि त्यांना विजेते असे घोषित करत आहे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-