Monday, July 1, 2024

अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदू धर्माबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘हिंदू असणे हे जीवन…’

अनुपम खेर यांना अलिकडेच अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठातून हिंदू अभ्यासात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. आता त्यांनी ‘हिंदू धर्माच्या तत्वज्ञाना’बद्दल आपले मत मांडले आहे.

प्रसिद्ध अभिनेता अनुपम यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितले की, हिंदू धर्म करुणा, समानता, निःस्वार्थता आणि इतर धर्मांचा आदर करतो.

यासोबतच अनुपम यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून मुलाखतीचा १० मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याचे शीर्षक त्यांनी ‘बिंग हिंदू’ असे ठेवले. व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, “एक हिंदू होण्याच्या तत्त्वज्ञानाबद्दल आठवड्यापूर्वी दिलेली एक मुलाखत शेअर करत आहे. आज, जेव्हा मी डॉ. श्रद्धा बिंद्रू यांना श्रीनगरमध्ये मरण पावलेल्या एम.एल. बिंद्रूजींविषयी बोलताना ऐकले, तेव्हा आपण हिंदू आहोत या तत्त्वज्ञानाचे पालन करतो आणि याची पुष्टी झाली. या कुटुंबाला शक्ती आणि प्रेम देत आहे.”

त्यांनी भगवद्गीतेतील अर्जुनाला सांगितलेले श्रीकृष्णाचे शब्द पुन्हा सांगितले. ते म्हणाले की, “कर्म करा, फळाची चिंता करू नको.” अभिनेत्यांनी सांगितले की, हा मंत्र त्यांनी आपल्या कारकिर्दीत देखील अंमलात आणला आहे आणि ते कठोर परिश्रम करतात आणि टीकेकडे दुर्लक्ष करतात.

त्यांनी नुकतेच इंस्टाग्रामवर आपल्या पुरस्कार विजेत्या भाषणाचा एक व्हिडिओही शेअर केला होता. यामध्ये त्यांनी हिंदू धर्म जगण्याच्या पद्धतीचे कारण सांगितले. त्यांनी लिहिले होते की, “मला का वाटते की, हिंदू असणे हे जीवन जगण्याची एक पद्धत आहे. हे केवळ धर्माशी संबंधित नाही. ही आहे हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेची मानद डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतरचे माझे भाषण. हे माझ्या बालपणीपासून ते मोठे होण्यापर्यंतची कहाणी आहे.”

अनुपम यांनी नुकतेच आपल्या आगामी ‘ऊंचाई’ चित्रपटाची घोषणा केली आहे. याचे दिग्दर्शन सुरज बडजात्या करत आहेत. त्यांनी काठमांडू येथे चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी

-आर्यनचे वकील मानेशिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आर्यनला ‘ग्लॅमरचा तडका’ लावण्यासाठी…

-काय सांगता? ज्याने आर्यन खानला ‘धरलं’ तोच निघाला फरार आरोपी, क्रूझ प्रकरणात नवा ट्विस्ट

हे देखील वाचा