Monday, July 1, 2024

द ग्रेट खलीपेक्षा उंच होण्याचा मार्ग दाखवत अनुपम खेर यांनी केला हटके ‘हा’ जुगाड

अभिनेते अनुपम खेर( Anupam Kher) ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाच्या दमदार यशामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. चित्रपटात अनुपम खेर यांची महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे देशभरातून कौतुक करण्यात आले होते. अभिनेते अनुपम खेर त्यांच्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावरच्या पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते नेहमीच विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात ज्याची सोशल मीडियामध्ये चर्चा होत असते. सध्या त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे या फोटोचा किस्सा चला जाणून घेऊ. 

 

 

‘द काश्मिर फाइल्स’ मुळे सतत चर्चेत असणारे अनुपम खेर सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांची मने जिंकतात. द विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाइल्स या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे लोक आजही कौतुक करतात हे त्यांच्या अभिनयाचेच यश म्हणावे लागेल. मात्र सध्या त्यांच्या चित्रपटाची नव्हेतर एका व्हायरल फोटोची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अनुपम खेर यांनी नुकताच द ग्रेट खलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. पहिल्या फोटोमध्ये अनुपम खेर खलीसोबत उभे असल्याचे दिसत आहे, मात्र ते दिसत नाहीत. आणि दुसऱ्या फोटोत अनुपम खेर खुर्चीवर उभे आहेत ज्यामध्ये ते खलीसोबत फोटो काढताना दिसत आहेत.

या फोटोसोबत अनुपम खेर यांनी “खलीपेक्षा उंच होण्याचा एकच मार्ग शिल्लक होता.” असा मजेशीर कॅप्शन दिला आहे. हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी फोटोवर बडे मियाँ छोटे मियाँचाही टॅग लावला आहे. दरम्यान अभिनेते अनुपम खेर यांचा द काश्मिर फाइल्स चित्रपट १९९० मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या अन्याय अत्याचारावर आधारित होता. चित्रपट जितका लोकप्रिय ठरला तितकाच तो विविध कारणांमुळे वादातही सापडला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा