छोट्या पडद्यावरील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ठाकूर सज्जन सिंग उर्फ अनुपम श्याम यांचे रविवारी (८ ऑगस्ट) निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते मुंबईच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते.
अनुपम श्याम यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री योगींनी २० लाख रुपयांची मदत केली होती. उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले होते की, मुख्यमंत्री मदत निधीतून त्यांना मदत देण्यात आली होती.
Television actor Anupam Shyam passes away at the age of 63 in Mumbai due to multiple organ failure. pic.twitter.com/jzcJ5nXsx0
— ANI (@ANI) August 8, 2021
तसेच त्याच्या कुटुंबीयांनी सलमान खानच्या बिंग ह्युमन फाऊंडेशनला मदत करण्याचे आवाहन केले. तसेच मनोज बाजपेयींनीही त्यांना फोन केला होता. दोघांनी ‘सत्या’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांचा भाऊ अनुरागने गेल्या वर्षी कळवले होते की, पैशाअभावी त्यांच्या भावाला चांगले उपचार मिळत नाहीत. सलमानच्या बिंग ह्युमन चॅरिटी फाऊंडेशनची मदत घेण्यासाठी तो आला असल्याचे त्याने सांगितले होते. त्यावेळी मनोज बाजपेयीनेही फोन करून मदतीचे आश्वासन दिले होते.
अनुपम श्याम यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट आणि शोमध्ये काम केले होते. पण त्यांना ‘प्रतिज्ञा’ या टीव्ही मालिकेतून जबरदस्त ओळख मिळाली. अनुपम श्यामचा चित्रपट प्रवास एका आंतरराष्ट्रीय चित्रपटापासून सुरू झाला. याशिवाय ते ‘मन की आवाज प्रतिज्ञा’, ‘कृष्णा चली लंडन’ आणि ‘डोली अरमानो की’ या मालिकांमध्येही दिसले होते. त्याच वर्षी त्यांनी ‘मन की आवाज प्रतिज्ञा’च्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…