Saturday, August 9, 2025
Home टेलिव्हिजन अनुपमा फेम अभिनेत्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, वयाच्या 51 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

अनुपमा फेम अभिनेत्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, वयाच्या 51 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

टेलिव्हिजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अनुपमा या सुपरहिट मालिकेमुळे अमाप लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेता नितेश पांडे यांचे दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ५१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत स्वतःची ओळख निर्माण केली होती. नितेश यांच्या निधनामुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून, कोणाचाही या बातमीवर विश्वास बसत नाही.

नितेश पांडे हे सध्या नाशिक जवळील इगतपुरी परिसरात शूटिंगसाठी गेले होते. तिथे २३ मे मंगळवारी रोजी रात्री त्यांना अचानक छातीत दुखायला लागले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान नितेश पांडे यांचा साडू असलेल्या निर्माता सिद्धार्थ नगर यांनी त्यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. नितेश मागील अनेक दशकांपासून या ग्लॅमर जगात कार्यरत होते. त्यांना अनेकदा अनुपमा मध्ये अनुजच्या मित्राच्या भूमिकेत पाहिले गेले आहे. नितेश यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावरही ही बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे.

सिद्धार्थ नगर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे. एका मोठ्या मीडिया हाऊसशी बोलताना सिद्धार्थ यांनी सांगितले की, नितेश इगतपुरीमध्ये शूटिंग करत असताना मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास त्यांना अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले. आता त्यांचे सर्व कुटुंबीय इगतपुरीला रवाना झाला आहे.

दरम्यान १७ जानेवारी १९७३ साली नितेश यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या हिमतीवर या क्षेत्रात येऊन नाव कमवले. अनेक बॉलिवूड सिनेमे आणि टीव्ही मालिकांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ‘ओम शांति ओम’ सिनेमात त्यांनी शाहरुख खानच्या मॅनेजरची भूमिका साकारली होती. सध्या ते अनुपमा या मालिकेत दिसत होते.

हे देखील वाचा