Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

Anupama: अनुजच्या शरीरावर दिसल्या गंभीर जखमा, अनुपमा मालिकेत येणार सर्वात मोठा ट्विस्ट!

टीआरपीच्या यादीत नेहमीच आघाडीला असलेली हिंदी मालिका म्हणजे ‘अनुपमा’ होय. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत आतापर्यंत अनेक ट्विस्ट आले आहेत. परंतु येणाऱ्या काही भागात या मालिकेत सगळ्यात मोठा दुःखद ट्विस्ट दाखवला जाणार आहे. या मालिकेत अनुज कपाडिया आणि अनुपमा यांच्या लग्नाची आणि प्रेम कहाणीची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. परंतु सेटवरून आता असे काही फोटो समोर आले आहेत. ज्यावरून समजत आहे की, अनुपमा आणि अनुज यांचा अपघात झाला आहे.

हे फोटो पाहून समजत आहे की, अनुज खूप वाईट प्रसंगातून जाणार आहे. या शोच्या सेटवरून काही फोटो समोर आहे. या फोटोत अनुपमा, अनुज, वनराज दिसत आहेत. हे फोटो पाहून अनुपमाच्या चाहत्यांचे हृदय तुटले आहे. हा या शोमधील सर्वात मोठा ट्विस्ट असणार आहे. या फोटोमध्ये वनराज आणि अनुपमा यांच्या डोळ्यात पाणी आलेले दिसत आहे. या फोटोत अनुज बेशुद्ध झालेला दिसत आहे, तर वनराज अनुपमाची माफी मागताना दिसत आहे.

या फोटोत दिसत आहे की, अनुजच्या शरीरावर जखमा झालेल्या आहेत. त्याची ही अवस्था बघून अनुपमा खूप घाबरते. अनुपमाच्या चेहऱ्यावर देखील छोटीशी जखम झालेली दिसत आहे. हे फोटो पाहून सगळ्यांच्या मनात असा प्रश्न येत आहे की, अनुपमा आणि अनुज यांच्या प्रेम कहाणीचे आणि लग्नाचे आत काय होणार आहे. तसेच अनुजचे या मालिकेतील पात्र आता संपवणार आहेत, म्हणून असा ट्विस्ट आणला आहे? या घटनेनंतर दोघे वेगळे होतील का? की वनराजने मुद्दाम हा अपघात घडवून आणला आहे? त्यामुळे आता नक्की या मालिकेत काय घडणार आहे हे आता येणाऱ्या भागातच समजणार आहे. अनुपमा ही मालिका खूप लोकप्रिय आहे. या मालिकेचा मराठीमध्ये ‘आई कुठे काय करते’ हा रिमेक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा