Sunday, April 20, 2025
Home अन्य ‘अनुपमा’ मालिकेतील सुनेने चक्क आपल्या सासऱ्यासोबत केला रोमान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

‘अनुपमा’ मालिकेतील सुनेने चक्क आपल्या सासऱ्यासोबत केला रोमान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

सध्या टीव्हीवर एकापेक्षा एक मालिका सुरू आहेत. इतकेच नव्हे तर अनेक टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. कमी कालावधीत काही मालिकांनी मनोरंजन करत अव्वल स्थान मिळवले आहे. यापैकी एक मालिका म्हणजे ‘अनुपमा’. सध्या स्टार प्लसवर सुरू असलेली ही मालिका अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांना यातील प्रत्येक पात्र खूपच आवडत आहे. खूप कमी वेळात या मालिकेने इतर मालिका मागे सोडले आहे.

ही मालिका जुलै २०२० मध्ये सुरू झाली आहे. या मालिकेने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच टीआरपी यादीमध्ये मजबूत पकडसह अव्वल स्थान निर्माण केले आहे. सर्व कलाकारांनी देखील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमध्ये अनुपमा आणि वनराज यांचा घटस्फोट झाला असून, आता या मालिकेत अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान, या मालिकेत आणखी एका पात्राची एंट्री झाली आहे, आणि ते पात्र म्हणजे अनुज कपाडिया. त्याच्या नुकत्याच झालेल्या एंट्रीमुळे मालिकेत अनेक मनोरंजक ट्विस्ट आले आहेत. यासोबतच या मालिकेमधील अनुज आणि अनुपमा यांचा ट्रॅकही प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

कलाकार जरी पडद्यावर गंभीर पात्र साकारत असले किंवा गंभीर वाटत असले तरी पडद्यामागे ते तसे अजिबात नसतात. हे सर्व कलाकार पडद्यामागे खूप मजा मस्ती करतात. हे कलाकार बऱ्याचदा त्यांचे मजामस्ती करत असणारे मनोरंजक क्षण सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात. या शोचे सर्व कलाकार सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याच दरम्यान, ‘अनुपमा’ या मालिकेत वनराजची भूमिका साकारणारे अभिनेते सुधांशु पांडे आणि किंजल अर्थात निधी शाह यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वनराज अर्थात सुधांशु त्याच्या मालिकेत दाखवण्यात आलेल्या सुनेसोबत म्हणजेच निधीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. निधी शहा आणि सुधांशु पांडे यांची जोडी या व्हिडिओमध्ये खूप छान दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुधांशु निधीसोबत तेलुगु चित्रपट ‘मेरी २’ मधील ‘राऊडी बेबी’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.

अभिनेत्री निधीने या व्हिडीओमध्ये केशरी आणि गुलाबी कॉम्बिनेशन असलेली सुंदर साडी घातली आहे. तर दुसरीकडे, वनराज अर्थात सुधांशु पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला असून, सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. इतकेच नव्हे तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे. त्याचबरोबर काही जण या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहे. एका चाहत्याने लिहिले की, “लोक काय म्हणतील मिस्टर शहा?” या मालिकेत अजून पुढे कोणते कोणते ट्विस्ट येणार आहेत हे पाहणे उत्साहाच ठरेल.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केबीसी १३’मध्ये महिला स्पर्धकाने ‘बिग बीं’ना विचारला ‘हा’ प्रश्न, अभिनेते म्हणाले, ‘मी सांगणार नाही…’

-करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

 

हे देखील वाचा