Saturday, July 6, 2024

‘अनुपमा’च्या सेटवरून धक्कादायक व्हिडिओ आला समोर; मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेने दाबला अनुपमाच्या होणाऱ्या सुनेचा गळा

‘अनुपमा’ मालिका गेल्या काही दिवसापासून खूप चर्चेत आहे. रुपाली गांगुली, सुधांशु पांडे आणि मदालसा शर्मा या कलाकारांचा समावेश असलेली ‘अनुपमा’ या मालिकेचे प्रत्येक भाग चाहते अत्यंत उत्सुकतेने पाहतात. मालिकेचे अनुसरण करणारे दर्शकही सेटमधून बाहेर पडलेले व्हिडिओ पसंत करतात. नुकत्याच काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदालसा शर्माने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मदालसा आणि अनुपमाची होणारी सून दिसत आहे. दोघी बाथटबमध्ये ‘पिया पिया’ गाण्यावर नाचत आहेत. त्या दोघी स्पा करत सुट्टीचा भरपूर आनंद लुटत आहेत. त्या दोघींनी सारख्याच रंगाचे कपडे घातले आहे. तसेच दोघींनी एक सुंदर लाल रंगाचे फुल केसात गुंफले आहे. ते या ड्रेसला अगदी शोभून दिसत आहे. यामध्ये मदालसा ही क्रिम लावता लावता अचानक अनुपमाच्या होणाऱ्या सुनेचा (नंदिनी) गळा आवळते. त्यावर दोघींचे हावभाव बघण्यासारखे आहेत.

या व्हिडिओमध्ये मदालसा शर्मासोबत अनघा भोसले दिसत आहे. अनघा भोसले हिने ‘अनुपमा’ मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारली आहे. मदालसा आणि अनघाचा हा व्हिडिओ पाहून चाहते हैराण झाले आहेत, तर काही चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडिओचा खूप आनंद लुटला आहे.

या मालिकेतील अभिनेत्री रुपाली गांगुली ही काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती, तेव्हा चाहते चिंतेत पडले होते. तसेच तिने आपला ४४ वाढदिवस पीपीई किट घालून साजरा केला होता. ती यातून आता सुखरूप बाहेर पडली आहे.

तसेच मदालसा शर्मा ही बॉलिवूडमधीस दिग्गज अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची सून आहे. ती अने अनेक चित्रपटातून चाहत्यांसमोर आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

हे देखील वाचा